Download App

IND vs AUS 1st Test: कांगारूंना लोळवत भारताचा पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय

  • Written By: Last Updated:

नागपूर : भारतीय संघाने (India) पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासाठी अप्रतिम खेळ दाखवला. दुसऱ्या डावात अश्विनची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळात आली नाही. यामुळे त्यांच्या विकेट्स पडल्या. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. विशेष बाब म्हणजे अश्विनने दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या. त्याचवेळी जडेजाने 2 तर अक्षर पटेलने 1 बळी घेतला. ऑस्ट्रेलियाकडून एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 25 धावा केल्या तर मार्नस लबुसेनने 17 धावा केल्या.

तत्पूर्वी या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज टिकू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 177 धावांत आटोपला. रवींद्र जडेजाने 5 बळी घेतले. त्याचवेळी रविचंद्रन अश्विनने 3 बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

त्यांनतर खेळण्यासाठी उतरलेली टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने वेगवान फलंदाजी केली. त्याने 120 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी रवींद्र जडेजाने 70 धावा केल्या. अक्षर पटेलने 84 धावांचे योगदान दिले. पटेलनेही शानदार फलंदाजी केली. शमीने पटेलसोबत 52 धावांची अर्धशतकी भागीदारी केली.

मात्र, शमी जास्त वेळ क्रीजवर टिकला नाही आणि त्याला 47 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने केवळ 37 धावा करता आल्या. गोलंदाज पॅट कमिन्सने भारताचा पहिला डाव संपुष्टात आणला. यादरम्यान भारतीय संघाने 10 गडी गमावून 400 धावा केल्या आणि 223 धावांची आघाडी घेतली.

भारताचा पहिला डाव 139.3 षटकात 400 धावांवर संपला. अशा प्रकारे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 223 धावांची आघाडी मिळाली. परंतु दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 32.2 षटकात 91 धावांवर आटोपला. भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक 8 विकेट्स घेत आस्ट्रेलिया संघाला खिंडार पाडली. भारतीय संघाने आता चार सामन्यांच्या मालिकेत 1- 0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Tags

follow us