Download App

Ind vs Aus 1st test : नागपूर कसोटीदरम्यान भारतीय टीमला मोठा धक्का ; ‘या’ खेळाडूची संपूर्ण मालिकेतून माघार

Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला सुरूवात झाली. (Ind vs Aus 1st test) नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचे वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळालं. (border gavaskar trophy) ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फलंदाजीत दमदार फटकेबाजी सुरू ठेवली आहे. (Team India) यादरम्यान भारतीय टीमसाठी वाईट बातमी समोर आली. टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ सामन्यांच्या संपूर्ण बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का राहणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण ४ सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत या मॅचविनरची अनुपस्थिती भारतीय संघाला मोठा धक्का देणारी आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही. बीसीसीआय बुमराहला खेळवण्याची तयारीच्या मनस्थितीत नाही. आगामी वन डे वर्ल्ड कप लक्षात घेता BCCI ला त्याच्याविषयी पुन्हा कोणताही धोका पत्करायचा नाही.

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून अगोदरच बाहेर झाला होता. पण आता तो बॉर्डर गावस्कर मालिकेच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नाही. BCCIने अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता वर्वतली.

जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांची इच्छा आहे की, त्याने आयपीएल २०२३ पूर्वी टीम इंडियासाठी किमान दोन कसोटी सामने खेळावे, परंतु याची शक्यता फारच कमी दिसत आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत संपूर्ण जबाबदारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यावर येणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या ९ महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. जसप्रीत बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध T- २० मालिकेत खेळला होता. तेव्हाही बीसीसीआयने त्याला खेळवण्याची घाई केली होती आणि यानंतर त्याला T- २० वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागली.

Tags

follow us