वैभव सूर्यवंशी दुसरा सामना खेळणार की संजू अन् अभिषेकला पुन्हा मिळणार संधी? प्रशिक्षक मॉर्केलने केला मोठा खुलासा

Vaibhav Suryavanshi :  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 4 जुलै रोजी खेळवला जाणार

Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi :  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 4 जुलै रोजी खेळवला जाणार असून या सामन्या आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. पहिल्या टी20 सामन्यात भारतीय टॉप ऑडर फेल ठरल्याने वैभवला संधी देण्यात यावी अशी मागणी चाहत्यांकडून सुरु आहे.

तर दुसरीकडे दुसऱ्या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) संधी मिळणार नसल्याचे संकेत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel) यांनी दिले आहे. 15  वर्षीय प्रतिभावान फलंदाज वैभव सूर्यवंशी संघाच्या दारावर दस्तक देत असूनही, संघ व्यवस्थापन सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना सहजपणे वगळणार नाही असं माध्यमांशी बोलताना भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल म्हणाले.

 संजू आणि अभिषेक वर विश्वास   

आपल्याकडे अभिषेक शर्मासारखा उच्च दर्जाचा टी20 फलंदाज आहे आणि संजू विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता, या गोष्टीचा आपण आदर केला पाहिजे. संजूने आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली होती. प्रशिक्षक म्हणून, खेळाडूंवर विश्वास ठेवणे आणि त्यांना पाठिंबा देणे योग्य आहे. होय, एक तरुण खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत आहे आणि ही एक उत्साहवर्धक बाब आहे. पण मला वाटते की ही एक सकारात्मक बाब आहे केवळ या दोन खेळाडूंसाठीच नाही तर संपूर्ण संघासाठी की आपण आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो असं दुसऱ्या टी20 सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना मॉर्केल म्हणाला.

मेटाच्या मागे हात धुवून लागलं भारत सरकार, आता इंन्स्टावरील बाल लैंगिक शोषणाच्या जाहिरातीसाठी पाठवलं समन्स

 फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल नाही

संघ व्यवस्थापन फलंदाजीच्या क्रमात अनावश्यक बदल करण्याच्या बाजूने नाही, विशेषतः जेव्हा खेळाडूंनी त्या स्थानांवर यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. शेवटी, कामगिरीलाच सर्वाधिक महत्त्व असते. मात्र, केवळ बदलासाठी खेळाडूंना त्यांच्या नैसर्गिक फलंदाजीच्या स्थानावरून हलवायचे नाही. त्यामुळे, चला सूर्यवंशीला खेळवूया’ असे म्हणणे तितके सोपे नाही असे तो म्हणाला.

Exit mobile version