India vs Sri Lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॅल येथे खेळवला जात आहे. आज आज या सामन्याचा पाचवा आणि निर्णायक दिवस असून खेळाला सुरुवात झाली आहे.
सध्या श्रीलंकेकडून कर्णधार धनंजय डी सिल्वा (35 ) आणि सोनल दिनुशा (26 ) फलंदाजी करत आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज विजयासाठी प्रयत्नशील असेल. 372 धावांचे लक्ष्य उभारल्यानंतर भारताने यजमान श्रीलंकेवर आपली पकड मजबूत केली आहे. मंगळवारी दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या 34 षटकांत 4 बाद 84 अशी होती.
दिनुशाने पहिल्या डावात शतक झळकावले होते. श्रीलंकेला विजयासाठी अजून 288 धावांची गरज आहे, तर भारताला विजय मिळवण्यासाठी सहा विकेट्स हवे आहेत.
श्रीलंकेसमोर (Sri Lanka) ठेवण्यात आलेले 372 धावांचे लक्ष्य हे गॅल स्टेडियमवरील कसोटी सामन्यातील सर्वोच्च यशस्वी धाव पाठलागाच्या (run chase) विक्रमापेक्षा अधिक आहे. या मैदानावर आतापर्यंत सर्वोच्च यशस्वी धाव-पाठलागाचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी 2022 मध्ये 344 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले होते.
Day Five Ready 🙌
Inching closer to the start of the final day’s play in Galle 🏟️#TeamIndia need 6️⃣ wickets to win!
Updates ▶️ https://t.co/M9LVyCAp8y#SLvIND pic.twitter.com/mL2hUP8Trh
— BCCI (@BCCI) August 19, 2026
संपूर्ण श्रीलंकेचा विचार करता, सर्वोच्च यशस्वी धाव-पाठलागाचा विक्रम यजमान संघाच्याच नावावर आहे. 2017 मध्ये कोलंबो येथे झिम्बाब्वेविरुद्ध श्रीलंकेने 388 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले होते. याआधी, 2006 मध्ये कोलंबो येथे झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 352 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले होते.
कर्जत व जामखेडमधील उपजिल्हा रुग्णालयात पदे तातडीने भरा; रोहित पवारांची मागणी
