Download App

जामीनानंतर इन्फ्लुएन्सर सपनाचे क्रिकेटर पृथ्वी शॉ वर गंभीर आरोप

मुंबई : क्रिकेटपटू पृथ्वी शॉला(Prithvi Shaw) मारहाण आणि खंडणीच्या प्रकरणात अटक केलेली इन्फ्लुएन्सर सपना गिलला (Sapna Gill)सोमवारी जामीन मिळाला. जामीनानंतर सपनानं पृथ्वी आणि त्याच्या मित्राविरुद्ध मुंबई पोलिसांमध्ये (Mumbai Police) गुन्हा दाखल (Filed a case)केलाय. तिनं शस्त्रानं हल्ला, गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप पृथ्वी शॉ व त्याच्या मित्रावर केलाय. सपना म्हणाली की, जेव्हा ती तिच्या मित्रांना वाचवायला गेली, तेव्हा पृथ्वीनं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला होता.

मुंबईतील एका हॉटेलबाहेर 15 फेब्रुवारीला सपना गिल आणि पृथ्वी शॉ यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर, पृथ्वी शॉचा मित्र आशिष यादवच्या तक्रारीवरून, सपना आणि तिच्या तीन मित्रांना 17 फेब्रुवारीला अटक केली होती.

Women T20 WC 2023 : भारतीय महिलांची सेमी फायनलमध्ये धडक

पृथ्वीचा मित्र आशिषनं 50 हजार रुपयांच्या वसुलीसाठी सपनानं धमकावल्याचा आरोप केला होता. सपना आणि तिच्या साथीदारांना मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयानं 20 फेब्रुवारीला जामीन मंजूर केला होता. रिपोर्ट्सनुसार, जामीन मिळाल्यानंतर सपना म्हणाली की, 50 हजार म्हणजे आहे तरी काय, मी एका दिवसात दोन रील बनवून एवढी कमाई करेल.

जामीन मंजूर झाल्यानंतर सपनानं पृथ्वीवर काही आरोप केले आहेत. जामीन मिळाल्यानंतर सपना म्हणाली, शॉ आणि त्याचा मित्र ज्या प्रकारे माझ्या मित्राला मारत होते. ते पाहून मी तिथे पोहोचले. मी त्यांना मित्राला मारू नका अशी विनंती केली.

दुसरा म्हणजे सपना गिल म्हणाली की, घटनेदरम्यान पृथ्वी शॉने मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. आम्ही गुन्हा दाखल करू, असं म्हटल्यावर पृथ्वीनं विनवणी करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, तक्रार करू नका. त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला नाही.

पुढे सपना म्हणाली की, त्यांनी माझ्यावर 50 हजार रुपये उकळल्याचा आरोप केला आहे. आजकाल 50 हजार आहे तरी काय? मी दोन रील बनवेन आणि एका दिवसात एवढी कमाई करील, अशा पद्धतीनं आरोप केले आहेत.

Tags

follow us