IPL 2023 CSK Loss Match : आयपीलच्या 16 व्या हंगामाला काल सुरुवात झाली आहे. काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये हा सामना खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईच्या संघाचा पराभव झाला आहे. गुजरात टायटन्सने 5 विकेटने हा सामना जिंकला आहे.
हा सामना अतिशय अतीतटीचा झाला. शेवटच्या ओव्हर्समध्ये गुजरातला 8 रन्स बनवायचे होते. तेव्हा राहुल तेवतिया याने तुषार देशपांडेच्या ओव्हरमध्ये एक सिक्स व एक चौका मारुन चेन्नईला सामना जिंकून दिला. या सामन्यात चेन्नईकडून झालेल्या काही चुकांमुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याविषयमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्टोक्स- कॉन्वे यांचा फ्लॉप शो
चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने 92 धावांची तुफानी खेळी केली होती. पण त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. बेन स्टोक्स, डेवोन कॉन्वे, अंबाती रायडू यांच्यासारखे खेळाडू हे फ्लॉप राहिले.
टॉस हरल्याने झाले नुकसान
सामन्याच्या सुरुवातीलाच सीएसकने टॉस हारला त्यामुळे चेन्नईच्या संघासाठी अडचणी निर्माण झाल्या. गुजरात टायन्सच्या इनिंगवेळी मैदानावर दव पडले होते त्यामुळे त्यांना बॅटिंग करणे सोपे गेले.
धोनीचा इम्पॅक्ट प्लेअरचा डाव फसला
यावर्षी आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जात आहे. सीएसकने कालच्या सामन्यात तुषार देशपांडेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरवले होते. पण त्याने आपल्या 3.2 ओव्हरमध्ये 51 रन्स दिले आहेत.
रामायणचे अभिनेते शूटिंग वेळी ओढायचे सिगारेट, एक दिवशी चाहत्याने पाहिलं, अन् मग….
या व्यतिरिक्त चेन्नईच्या गोलंदाजीमध्ये अजिबात शिस्त दिसून आली नाही. त्यांना दोन नो बॉल टाकणे देखील महागात पडले. यावेळी गुजरातच्या टीमने याचा फायदा उचलत सिक्स व फोर मारला. तसेच गुजरातकडून शुभमन गिल याने जोरदार फटकेबाजी केली. चेन्नईच्या संघाकडे त्याचे काहीही उत्तर नव्हते.