Download App

IPL 2023 Final: नाणेफेक जिंकून चेन्नईची प्रथम गोलंदाजी, अशी आहे प्लेइंग 11

IPL 2023 Final: नाणेफेक जिंकून सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. पण गुजरातला आता प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. CSK च्या संघात कोणताही बदल झालेला नाही. गुजरातनेही अंतिम सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही.

28 मे रोजी झालेल्या सामन्यादरम्यान पाऊस पडला, त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना राखीव दिवशी होत आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचे प्लेइंग-11: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्ष्णा, मथिशा पाथिराना.

गुजरात टायटन्सची प्लेइंग-11: ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.

Tags

follow us

वेब स्टोरीज