IPL 2023 च्या अंतिम सामन्यावर पावसाचा परिणाम झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, मात्र पावसामुळे रविवारी रात्री 10.20 वाजेपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही. यासंदर्भात बरीच माहिती समोर आली आहे. सामन्यातील ओव्हर कटऑफबाबत अपडेट प्राप्त झाले आहे. रात्री 11 वाजता सामना सुरू झाला तर 12-12 षटकांचा सामना खेळवला जाईल.
जर हा सामना रात्री 11.45 वाजता सुरू झाला तर 7-7 षटकांचा सामना होईल. 11.15 वाजता सुरू झाल्यास 10-10 षटकांचा आणि 11.30 वाजता सुरू झाल्यास 9-9 षटकांचा सामना होईल. 12 वाजता सुरू झाल्यास 5-5 षटकांचा.सामना होईल. हेही शक्य नसेल तर सुपर ओव्हर होईल. जर सुपर ओव्हर नसेल तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. सोमवारचा दिवस अंतिम फेरीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
राखीव दिवशीही पाऊस पडल्यास किमान पाच षटकाचा सामना करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसे न झाल्यास सुपर ओव्हरद्वारे विजेता निश्चित केला जाईल. जर मैदान ओले राहिले आणि सुपर ओव्हरची शक्यता नसेल तर गुजरात संघ चॅम्पियन होईल, कारण हा संघ 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल होता.