फायनलमध्ये पुन्हा व्यत्यय, चेन्नईचा डाव सुरु होताच मुसळधार पाऊस

IPL Final 2023 : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु असलेल्या आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला आहे. अहमदाबादमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. चेन्नईच्या डावात तीन चेंडू खेळले गेले आहेत. खेळ थांबेपर्यंत सीएसकेची धावसंख्या 0.3 षटकात एकही बाद न होता चार धावा आहे. पावसाचा […]

UPSC Exam (3)

UPSC Exam (3)

IPL Final 2023 : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु असलेल्या आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला आहे. अहमदाबादमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. चेन्नईच्या डावात तीन चेंडू खेळले गेले आहेत. खेळ थांबेपर्यंत सीएसकेची धावसंख्या 0.3 षटकात एकही बाद न होता चार धावा आहे. पावसाचा जोर खूप असल्याने सामना पुन्हा सुरू होण्यास विलंब होऊ शकतो.

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने (GT) 20 षटकात 4 गडी गमावून 214 धावा केल्या. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऋद्धिमान साहाने 54 आणि साई सुदर्शनने गुजरातकडून 96 धावांची उत्कृष्ट खेळी केली. चेन्नईकडून गोलंदाजीत मथिशा पाथिरानाने 2 तर दीपक चहर आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली.

Exit mobile version