IPL: पॉवरप्लेमध्ये तगडे फलंदाज करत आहेत ‘टुकटूक’… यादीत ‘या’ दिग्गजांची नावे…

IPL 2023 : आयपीएल 2023 चा अर्धा हंगाम संपला आहे. परंतु अनेक मोठे फलंदाज जे पॉवरप्लेमध्ये ‘टुकटूक’ फलंदाजी करत आहेत. यामध्ये अनेकांनी बरेच डॉट बॉलही खेळले आहेत. या यादीत केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू आहेत. आम्‍ही तुम्‍हाला या आयपीएलच्‍या आतापर्यंतच्‍या टॉप 10 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी पॉवरप्‍लेमध्‍ये भरपूर डॉट बॉल […]

Befunky Collage 44 1106436 1651669767

Befunky Collage 44 1106436 1651669767

IPL 2023 : आयपीएल 2023 चा अर्धा हंगाम संपला आहे. परंतु अनेक मोठे फलंदाज जे पॉवरप्लेमध्ये ‘टुकटूक’ फलंदाजी करत आहेत. यामध्ये अनेकांनी बरेच डॉट बॉलही खेळले आहेत. या यादीत केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू आहेत.

आम्‍ही तुम्‍हाला या आयपीएलच्‍या आतापर्यंतच्‍या टॉप 10 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी पॉवरप्‍लेमध्‍ये भरपूर डॉट बॉल खेळले आहेत. या यादीत फ्लॉप टीम दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर अव्वल स्थानावर आहे. डेव्हिडने 7 सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये 68 डॉट बॉल खेळले आहेत, त्याने आतापर्यंत 168 धावा केल्या आहेत.

लखनौ सुपर जायंट्सचा काईल मेयर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. काइलने पॉवरप्लेमध्ये 53 डॉट बॉल खेळले आहेत. काइलने एकूण सात सामन्यांत 150 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) डेव्हिड कॉनवे डॉट बॉल खेळण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 47 डॉट बॉल खेळले आहेत. त्याचबरोबर त्याच्या बॅटने 7 सामन्यात 139 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा (MI) इशान किशन चौथ्या स्थानावर आहे. पॉवरप्लेमध्ये त्याने 47 डॉट बॉल खेळले आहेत. इशानच्या बॅटने 7 सामन्यात 148 धावा केल्या आहेत.

या यादीत फाफ डू प्लेसिस पाचव्या क्रमांकावर आहे. फॅफने एकूण 8 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने पॉवरप्लेमध्ये 46 डॉट बॉल खेळले आहेत. फॅफने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 201 धावा केल्या आहेत.

मला पिढीचंच आश्चर्य वाटतं… राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

सहाव्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आहे. राहुलने 7 आयपीएल सामने खेळले आहेत. या 7 सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये त्याने 45 डॉट बॉल खेळले आहेत. त्याचबरोबर केएल राहुलने एकूण 128 धावा केल्या आहेत.

पॉवरप्लेमध्ये डॉट बॉल खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये ऋद्धिमान साहा, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. साहा आणि जैस्वाल यांनी 7 सामन्यात अनुक्रमे 45 आणि 44 डॉट बॉल खेळले आहेत. तर विराट कोहलीने 8 सामन्यात 43 डॉट बॉल खेळले आहेत.

Exit mobile version