Download App

IPL 2023 : 3 जागा, 8 मॅच, 7 संघ; कोण गाठणार प्लेऑफ, समजून घ्या गणित

  • Written By: Last Updated:

IPL : Seven teams are in the race for the remaining three spots in the playoffs

आयपीएलमध्ये (IPL 2023) प्लेऑफची लढाई अटीतटीची झाली आहे. आतापर्यंत साखळी फेरीत 62 सामने खेळले गेले असून आता केवळ 8 सामने बाकी आहेत. मात्र सद्यस्थितीत केवळ एकाच संघाला प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आले आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. तर दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता प्लेऑफमधील 3 जागांसाठी उर्वरित 8 सामन्यांत 7 संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.

गुजरात टायटन्स

गुजरात संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातने हैदराबादचा पराभव करून टॉप 4 मध्ये स्थान पक्के केले. गुजरातचे सध्या 18 गुण असून त्यांचा एक सामना बाकी आहे. त्यामुळे हा संघ पहिला किंवा दुसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. गुजरातचा पुढील सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा साखळी फेरीतील 1 सामना शिल्लक आहे. 20 मे रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने येणार आहेत. चेन्नईचे 13 सामन्यांत 15 गुण आहेत. तर त्याचा नेट रनरेट 0.381 आहे. दिल्लीला पराभूत केल्यास चेन्नईचे प्लेऑफमधीस स्थान निश्चित होईल. तर चेन्नईचा संघ दिल्लीकडून पराभूत झाल्यास प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडू शकतो. अजूनही 5 संघांना 16 गुण मिळवण्याची संधी आहे.

मुंबई इंडियन्स

स्पर्धेत संथ सुरुवात करणारा मुंबई इंडियन्सचा संघ आता विजेतेपदाचा दावेदार बनला आहे. मुंबईने 12 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत. तर मुंबईचा नेट रनरेट -0.117 आहे. मुंबईला लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध 2 सामने खेळायचे आहे. मुंबईने दोन्ही सामने जिंकले तर ती सहज प्लेऑफमध्ये पोहोचेल. जर तो 1 सामना हरला तर त्यांचे एकूण 16 गुण होतील. त्यानंतर मात्र मुंबईला इतर संघांचा निकाल आणि नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागणार आहे. दोन्ही सामने गमावल्यास मुंबईच्या प्लेऑफमध्ये खेळणाऱ्या आशा संपुष्टात येतील. 2 संघांनी आधीच 15 किंवा अधिक गुण मिळवले आहेत. त्यानंतर चौथ्या स्थानासाठी मुंबईला 4 संघांशी झुंज द्यावी लागेल. या दरम्यान, नेट रनरेट खूप महत्वाचा होईल.

लखनौ सुपर जायंट्स

लखनौने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. त्यात संघाचे 13 गुण आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ अजून 2 सामने खेळायचे आहेत. तिने दोन्ही सामने जिंकल्यास लखनौ सहज प्लेऑफमध्ये पोहोचेल. मात्र एक सामना गमावूनही पुढे जाऊ शकतो, पण नेट रनरेट महत्त्वाचा असेल. दोन्ही लढतींमध्ये हरल्यास लखनौ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

आरसीबीच्या संघाने राजस्थानविरुद्ध मोठा विजय मिळवत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. आरसीबीचा संघ आता 0.166 नेट रनरेटसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आरसीबीला सध्या सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध 2 सामने खेळायचे असून या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना मोठा विजय मिळविण आवश्यक आहे. मात्र या दोन्ही विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार नसून त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. अशात दोन्हीपैकी एक जरी सामना गमावला तर आरसीबीच्या प्लेऑफमधील आशा संपुष्टात येतील.

राजस्थान रॉयल्स

राजस्थानने 13 सामने खेळले आहेत. यात राजस्थानचे फक्त 12 पॉईंट्स असून नेट रनरेट 0.140 आहे. राजस्थानला आता पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचे आहे. पंजाबविरुद्ध जिंकल्यास त्यांचे 14 गुण होतील. अशा परिस्थितीत इतर संघांचे निकाल त्यांच्या बाजूने लागले तर राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. गतवर्षीचा उपविजेता राजस्थान संघ आता या आयपीएलमध्ये नशिबावर अवलंबून आहे. जर आरसीबी, लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्जने त्यांचे दोन्ही सामने गमावले आणि सनरायझर्सने गुजरात किंवा मुंबईविरुद्ध कोणताही सामना गमावला तर राजस्थान संघ या परिस्थितीत 14 गुणांसह पुढे जाऊ शकतो. अशा स्थितीत चौथ्या स्थानासाठी राजस्थान आणि कोलकाता यांच्यात लढत होणार आहे.

पंजाब किंग्ज

पंजाबचे 12 सामन्यांत 12 गुण आहेत. त्यांना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचे आहे. 16 किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या सहा संघांमध्ये पंजाबचा समावेश आहे. तिने दोन्ही सामने जिंकल्यास तिचे 16 गुण होतील. त्याचा नेट रनरेट खूपच कमी आहे. पंजाबला दोन्ही सामन्यांमध्ये मोठा विजय मिळवावा लागेल, अन्यथा त्यांना इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. दोन्हीपैकी एकही सामना गमावल्यास पंजाबचे 14 गुण होतील आणि त्यानंतर त्यांना इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाताचे 13 सामन्यांतून 12 गुण आहेत आणि त्यांना लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध 1 सामना खेळायचा आहे. कोलकाताने हा सामना जिंकल्यास त्यांचे 14 गुण होतील. पण या विजयानंतरही कोलकाता थेट प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही. सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर कोलकात्यालाही इतर संघाच्या निकालावर आणि नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागणार आहे.

Tags

follow us