IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या उद्घाटनाच्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने 179 आव्हान 5 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकात पूर्ण केले.
179 धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 3.5 षटकांत 37 धावांची भागीदारी केली. राजवर्धन हंगरगेकरने रिद्धिमान साहाला (25 धावा) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. यानंतर साई सुदर्शन (22) आणि शुभमन गिल यांनी 53 धावा जोडल्या, त्यामुळे गुजरात संघ मजबूत स्थितीत पोहोचला. यानंतर सीएसकेने काही विकेट घेत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे गुजरातची धावसंख्या 18 षटकांत 5 बाद 156 अशी झाली.
यादरम्यान गुजरातने गिल, हार्दिक पंड्या (0) आणि विजय शंकर (27) यांच्या विकेट्स गमावल्या. शेवटच्या दोन षटकात गुजरात टायटन्सला विजयासाठी 23 धावांची गरज होती आणि सामना कोणाच्याही बाजूने जाऊ शकेल अशी परिस्थिती होती. अशा स्थितीत राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी मोठे फटके मारत संघाला विजय मिळवून दिला. तेवतियाने नाबाद 15 धावांची खेळी केली आणि रशीदने निर्णायक 2 चेंडूत 10 धावा केल्या. सीएसकेकडून राजवर्धन हंगरगेकरने सर्वाधिक तीन बळी घेतले.
A successful final-over chase at the Narendra Modi Stadium to kick off #TATAIPL 2023 🔥🔥
The @rashidkhan_19–@rahultewatia02 duo at it again as @gujarat_titans secure a win against #CSK💪
Scorecard ▶️ https://t.co/61QLtsnj3J#GTvCSK pic.twitter.com/uKS9xJgIbw
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
सीएसकेची सुरुवात खराब झाली
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या शानदार 92 धावांच्या जोरावर CSK संघाने सात गडी बाद 178 धावा केल्या. सीएसकेची सुरुवात खूपच खराब झाली आणि तिसर्याच षटकात डेव्हॉन कॉनवेने केवळ 1 धाव करून बाद झाला. कॉनवेला मोहम्मद शमीने बोल्ड केले. यानंतर ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांनी 36 धावांची भागीदारी करत सीएसकेला 50 धावांपर्यंत नेले.
IPL 2023: विजयासाठी गुजरातपुढे 179 धावांचे आव्हान
ऋतुराज गायकवाडची झंझावाती फलंदाजी सुरूच राहिली आणि त्याने हार्दिकवर लागोपाठ दोन षटकार खेचले आणि त्यानंतर अल्झारी जोसेफवर तीन षटकारांसह अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, अंबाती रायुडू 12 धावाकरून बाद झाला. शिवम दुबे अजिबात लयीत दिसला नाही आणि त्याच्या संथ फलंदाजीचे दडपण ऋतुराज गायकवाडवर दिसून आला तो अल्झारी जोसेफच्या फुल टॉसवर बाद झाला. त्याने 50 चेंडूंच्या खेळीत नऊ षटकार आणि चार चौकारच्या मदतीने 92 धवनची खेळी केली.
त्याच ओहरमध्ये रवींद्र जडेजा बाद झाला. दुबेने शमीला षटकार खेचला पण पुढच्याच चेंडूवर तो रशीद खानकडे झेलबाद झाला. कर्णधार एमएस धोनीने एक चौकार आणि एक षटकार 7 चेंडूत नाबाद 14 धावा करत CSK ला 180 धावांच्या जवळ नेले.