Balasaheb Thorat : २० हजार कोटींचा ‘तो’ प्रश्न विचारला… अन् गांधीची खासदारकी गेली!

Balasaheb Thorat : २० हजार कोटींचा ‘तो’ प्रश्न विचारला… अन् गांधीची खासदारकी गेली!

Balasaheb Thorat : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारीला संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौतम अडाणी यांच्या संदर्भात तुमचे नक्की काय संबंध आहेत. हा प्रश्न विचारल्यानेच गुजरातमधील प्रकरण एका दिवसांत ओपन करून त्यावर तातडीने निर्णय देऊन दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लगेचच खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे इतके झटपट केले गेले आहेत. त्यामुळे भारतातील लोकशाही कोणत्या मार्गाने जाणार आहे, असे प्रश्न असून सर्वसामान्य तसेच नेत्यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर यांनी केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, अडाणी यांच्याकडे २० हजार कोटी रुपये कसे आले, कुठून आले आले आहेत, या प्रश्नांची उत्तरं मात्र पंतप्रधान मोदी यांनी दिले नाही. मात्र, प्रश्न विचारणाऱ्यालाच बाहेर काढले जात आहे. आता सर्वसामान्य लोकांना देशातील लोकशाही कोणत्या मार्गाने जाणार हे समजू लागले आहे.

Swapnil Joshi Idia Film Bazaar Portal : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी शासनाचे ऑनलाईन पोर्टल लवकरच!! – Letsupp

बेरोजगारी, महागाईच्या विरोधात भाजपची कार्यपद्धती काय आहे, हे आम्ही आता जनतेला या आंदोलनातून सांगणार आहे. संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरात हे आंदोलन करणार आहोत. तसेच राहुल गांधी यांना बोलू दिले नाही. खरंतर एखाद्या सदस्यावर आरोप झाले तर त्याला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, भाजपच्या लोकसभा सदस्यांनी गोंधळ घालून राहुल गांधी यांना बोलूच दिले नाही. आपल्याला अडचणीचे प्रश्न राहुल गांधी विचारत असल्याने त्यांची खासदारकी रद्द केली आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.

(248) Nitin Gadkari : गडकरींच्या डोक्यात ‘उजनी’साठी खास प्लॅन | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube