IPL 2023 : RR vs CSK: आयपीएलच्या 16व्या मोसमात राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळत आहे. यावेळी जयपूर येथील राजस्थान संघाच्या घरच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी या मोसमात दोन्ही संघ आमनेसामने आले होते तेव्हा राजस्थानने हा सामना 3 धावांनी जिंकला होता.
दोन्ही संघांचे प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, अॅडम गेमा, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.
चेन्नई सुपर किंग्ज – रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश तिक्ष्णा, आकाश सिंग.
वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड करा; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडं मागणी
दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. या मैदानावर आतापर्यंत 48 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 32 वेळा विजय मिळवला असून केवळ 16 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना जिंकता आला. मात्र, या मोसमात आतापर्यंत येथे झालेल्या एका सामन्यात लखनौ संघाने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला.
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात 27 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत, त्यापैकी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने 15 वेळा विजय मिळवला आहे, तर राजस्थान संघाने 12 वेळा विजय मिळवला आहे.