बंगळुरू ठरला प्लेऑफमध्ये धडक मारणारा पहिला संघ; सलग सहा पराभवामुळे पंजाबची वाट अवघड…

IPL 2026 बंगळुरू प्लेऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे सलग सहा पराभवामुळे पंजाब किंग्ससाठी टॉप-4 मध्ये स्थान टिकवणे आता कठीण झाले आहे.

Ipl 2026 Banglaru Beat Punjab

Ipl 2026 Banglaru Beat Punjab

IPL 2026 : आयपीएलच्या 2026 च्या (IPL 2026) हंगामातील शेवटच्या टप्प्यातील लढती रंगतदार होत आहे. रविवारी झालेल्या महत्त्वाच्या लढतीत विराट कोहली (Virat Kohli) आणि व्यंकटेश अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलंजेर्स बंगळुरूने (Royal Challengers Bengaluru)पंजाब किंग्सचा (Punjab Kings) 23 धावांनी पराभव करत विजय मिळविला. याचबरोबर बंगळुरू प्लेऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे सलग सहा पराभवामुळे पंजाब किंग्ससाठी टॉप-4 मध्ये स्थान टिकवणे आता कठीण झाले आहे.

या लढतीत आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट गमावत 222 धावांचा मोठा स्कोर उभारला. प्रत्युत्तरात पंजाबची टीम शेवटच्या षटकापर्यंत झुंज देत 199 धावांपर्यंतच पोहोचू शकली.

रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द; भारतात पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार?


पंजाबचा सलग सहावा पराभव

जोरदार कामगिरी करणाऱ्या पंजाब संघाची नंतर खराब कामगिरी झाली आहे. आता या संघाचा सलग सहावा पराभव झाला आहे. या सामन्यात पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर प्रियांश आर्य शून्यावर बाद झाला. तर प्रभसिमरन सिंग 2 धावा करून माघारी परतला. या दोघांनाही भुवनेश्वर कुमारने बाद केले. कर्णधार श्रेयस अय्यरही फक्त 1 धाव करून तंबूत परतला. त्यानंतर कूपर कोनोलीने 37 आणि सूर्यांश शेडगेने 35 धावा करत थोडी झुंज दिली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यासाठी ते अपुरे ठरले. शेवटी शशांक सिंगने 56 आणि मार्कस स्टोइनिसने 37 धावांची खेळी केली. आरसीबीकडून रासिख सलाम दारने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.


झोपडपट्टीत काढले दिवस; पहिल्याच प्रयत्नात बनली अधिकारी, कोण आहे उम्मुल खेर?


आरसीबीने उभारला 222 धावांचा डोंगर

61 व्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्ससमोर 223 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर यांनी शानदार अर्धशतके झळकावली. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर आरसीबीने 20 षटकांत 4 गडी गमावून 222 धावा केल्या.

Royal Challengers Bengaluru


कोहलीची आणखी एक दमदार खेळी

जेकब बेथेल आणि विराट कोहली यांनी सलामीला 14 चेंडूत 21 धावा जोडल्या. बेथेल 7 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर कोहलीने देवदत्त पडिक्कलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 76 धावांची भागीदारी केली आणि संघाला 97 धावांपर्यंत नेले. पडिक्कलने 25 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 45 धावा केल्या.


वेंकटेश अय्यरची तुफानी फलंदाजी

पडिक्कल बाद झाल्यानंतर विराट कोहलीने वेंकटेश अय्यरसोबत डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 35 चेंडूत 60 धावांची भागीदारी करत संघाचा स्कोर 157 पर्यंत नेला. कोहलीने 37 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 58 धावांची खेळी केली. यानंतर वेंकटेश अय्यर आणि टिम डेविड यांनी अखेरपर्यंत आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी 30 चेंडूत 65 धावांची भागीदारी करत संघाला 222 धावांपर्यंत पोहोचवले. टिम डेविड 12 चेंडूत 28 धावा करून बाद झाला, तर वेंकटेश अय्यरने 40 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 73 धावा केल्या. पंजाबकडून हरप्रीत बरारने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Exit mobile version