आयपीएल 2026 चा हंगाम संस्मरणीय ठरला, तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या ऐतिहासिक विजयाने! अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव करत RCB ने सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सपाठोपाठ सलग दोनदा विजेतेपद मिळवणारा RCB हा आयपीएलच्या इतिहासातील केवळ तिसरा संघ ठरलाय. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो विराट कोहली!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु IPL किंग! सलग दुसरा विजय! गुजरात टायटन्सचा होम ग्राऊंडवर पराभव
अंतिम सामन्याच्या दबावात विराटने नाबाद 75 धावा कुटून संघाला विजयपथावर नेले. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वेगवान अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक नोंदवत या खेळीला खास बनवले, ज्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ सन्मानाने गौरवण्यात आले. तसं तर हा हंगाम केवळ RCB च्या विजयापुरता मर्यादित नव्हता, तर अनेक ऐतिहासिक विक्रमांचा तो साक्षीदार ठरला. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा उदय असो किंवा मैदानावर झालेला षटकारांचा पाऊस, 2026 च्या हंगामातील 10 असे विक्रम ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…
सर्वात तरुण ऑरेंज कॅप विजेता : 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (राजस्थान रॉयल्स) 776 धावा करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण ऑरेंज कॅप विजेता बनण्याचा मान मिळवला.
एका हंगामात सर्वाधिक षटकार : वैभव सूर्यवंशीने एका हंगामात एकूण 72 षटकार मारून ख्रिस गेलचा एका हंगामातील सर्वाधिक षटकारांचा (59) जुना विक्रम मोडीत काढला.
वेगवान 1000 धावा : वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत (440 चेंडू) 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्याने आंद्रे रसेलचा विक्रम मागे टाकला.
एका हंगामात 1300+ षटकार : आयपीएल 2026 च्या हंगामात एकूण 1300 पेक्षा जास्त षटकार मारले गेले, जो स्पर्धेच्या इतिहासातील एका हंगामातील सर्वोच्च आकडा आहे.
लक्ष्याचा यशस्वी पाठलाग : आयपीएल 2026 मध्ये ‘चेझिंग’ (दुसऱ्या डावात फलंदाजी) करणाऱ्या संघांनी सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला. 2016 चा (41 विजय) विक्रम मोडीत काढत या हंगामात 42 सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले.
के.एल. राहुलची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या : दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना के.एल. राहुलने नाबाद 152 धावांची खेळी केली, जी आयपीएल 2026 मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि आयपीएलमधील कोणत्याही भारतीयाची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
सर्वात वेगवान शतक : वैभव सूर्यवंशीने अवघ्या 36 चेंडूत शतक ठोकून या हंगामातील सर्वात वेगवान शतक नोंदवले.
पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा : वैभव सूर्यवंशीने पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
पर्पल कॅप आणि गोलंदाजी : गुजरात टायटन्सचा कगिसो रबाडा या हंगामात सर्वाधिक 29 विकेट्स घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरला.
एका हंगामात सर्वाधिक शतके : आयपीएल 2026 च्या हंगामात फलंदाजांकडून एकूण 15 शतके झळकावण्यात आली, ज्यामुळे हा हंगाम फलंदाजीसाठी अत्यंत प्रभावी ठरला.
