रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु IPL किंग! सलग दुसरा विजय! गुजरात टायटन्सचा होम ग्राऊंडवर पराभव

गुजरात टायटन्सचा आपल्या होम ग्राऊंडवर म्हणजे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पराभवक करत विजयी झेंडा फडकावला आहे.

News Photo 2026 05 31T230229.158 1

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL) अंतिम सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना झाला. त्यामध्ये सलग दुसऱ्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मोठा विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सचं 156 धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच गडी गमवून पूर्ण केलं.

गुजरात टायटन्सचा आपल्या होम ग्राऊंडवर म्हणजे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पराभवक करत विजयी झेंडा फडकावला आहे. गतविजेत्या आरसीबीने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्सने विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच गडी गमवून पूर्ण केलं. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स सलग जेतेपद जिंकणारा तिसरा संघ ठरला आहे.

नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या धारदार गोलंदाजीसमोर गुजरात टायटन्सची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. निर्धारित 20 षटकांत गुजरातला 8 बाद फक्त 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. वॉशिंग्टन सुंदरने 37 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शुभमन गिल 10 धावांवर, साई सुदर्शन 12 धावांवर आणि जोस बटलर 19 धावांवर बाद झाले. आरसीबीकडून रसिक दर सलामने तीन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

 

follow us