Download App

IPL : इतिहास रचण्यापासून युझवेंद्र चहल एक पाऊल दूर, या दिग्गजांना टाकणार मागे

  • Written By: Last Updated:

IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामना युझवेंद्र चहलसाठी खास ठरू शकतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चहल ड्वेन ब्राव्होसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. युझवेंद्र चहलच्या नावावर सध्या 142 सामन्यांत 21.60 च्या सरासरीने 183 बळी आहेत. ड्वेन ब्राव्होच्या नावावरही 161 सामन्यात 183 विकेट आहेत. आता या यादीत चहल 1 बळी मिळवून पहिल्या क्रमांकावर येईल.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या नावांवर नजर टाकली तर युझवेंद्र चहलशिवाय पियुष चावला, अमित मिश्रा आणि रविचंद्रन अश्विन यांची नावे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. युझवेंद्र चहलचा या आयपीएल मोसमातही आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्म पाहायला मिळाला आहे. चहलने 11 सामन्यात 19.41 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान चहलने एका सामन्यात दोनदा 4 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे.

या सामन्यात राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसन आपला 150 वा आयपीएल सामना खेळणार आहे. या सामन्यात सॅमसनने 75 धावा केल्या तर तो त्याच्या 6000 टी-20 धावा पूर्ण करेल. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा खेळाडू आंद्रे रसेल टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट पूर्ण करण्यापासून फक्त 3 विकेट दूर आहे.

आशिया कपमधून पाकिस्तान आऊट?; भारताचं पारडं जड

प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी राजस्थानला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

राजस्थान रॉयल्सच्या या मोसमातील आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर सुरुवातीच्या सहामाहीत ती खूपच प्रभावी होती. गेल्या 3 सामन्यात राजस्थानला सलग 3 पराभवांना सामोरे जावे लागले. आता राजस्थान 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. संघाने प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.

Tags

follow us