Download App

Irani Cup: यशस्वी जैस्वालचा डबल धमाका, आधी द्विशतक आणि नंतर शतक झळकावणारा पहिला भारतीय

  • Written By: Last Updated:

ग्वाल्हेर : यशस्वी जैस्वालने इराणी चषकातील पदार्पणाच्या सामन्यात इतिहास रचला आहे. ग्वाल्हेरमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध पहिला सामना खेळणाऱ्या यशस्‍वीने दुसऱ्या डावातही शतक झळकावले. त्याच सामन्यातील पहिल्या डावात त्याने 213 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही शतक झळकावण्यात तो यशस्वी ठरला. इराणी चषकाच्या एका सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

उर्वरित भारताचे प्रतिनिधित्व करणारा मुंबईचा फलंदाज यशस्वी जैस्वालने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात 259 चेंडूत 213 धावा केल्या. यादरम्यान त्याने 30 चौकार आणि 3 षटकार मारले. चमकदार फलंदाजी करताना त्याने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांची कसोटी पाहिली. पहिल्या डावात अभिमन्यू ईश्वरनला डावलले गेले, तर इतर सर्व खेळाडूंनी बहुतांशी निराश केले.

यादरम्यान यशस्वी एका टोकाला जोरदार फटके देत होता. दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे भारताच्या शेष संघाला पहिल्या डावात 484 धावा करता आल्या

यशस्वी जैस्वालची झंझावाती फलंदाजी दुसऱ्या डावातही कायम राहिली. तिसऱ्या दिवशी संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल खाते न उघडताच बाद झाला. अशा स्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जैस्वालने आघाडी घेतली. त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 53 चेंडूत 58 धावा करून आपले इरादे व्यक्त केले.

Tunisha Sharma Suicide प्रकरणातील आरोपी शीझान खानला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

सामन्याच्या चौथ्या दिवशी धडाकेबाज फलंदाजी करत त्याने दुसऱ्या डावातही आपले शतक पूर्ण केले. इराणी चषक सामन्याच्या दोन्ही डावात द्विशतक आणि शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.

इराणी कपमध्ये एका सामन्यात 300 किंवा त्याहून अधिक धावा करणारा शिखर धवननंतरचा तो दुसरा भारतीय फलंदाज आहे. वृत्त लिहिपर्यंत उर्वरित भारतीय संघाने दुसऱ्या डावात 7 विकेट गमावत 201 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल नाबाद 121 आणि पुलकित नारंगने 1 धावा केल्या. शेष भारत संघाने आतापर्यंत 391 धावांची आघाडी घेतली आहे.

Tags

follow us