अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या आहेत. या सामन्यात रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथला आपला शिकार बनवले. जडेजाने स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्यांदा बाद केले. यावेळी भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला चकमा देत बोल्ड केले. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे.
ICYMI – #TeamIndia's delightful breakthrough!@imjadeja breaks the partnership to get Steve Smith out 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/8DPghkx0DE#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/lJVW7uzi9h
— BCCI (@BCCI) March 9, 2023
जडेजा स्मिथला चकवा
या व्हिडिओमध्ये जडेजाने स्मिथला चकवा देऊन आउट केले. जडेजाचा हा बॉल स्मिथला अजिबात लक्षात आला नाही आणि त्याने इनसाईड एजमधून विकेट गमावली. विकेट गमावल्यानंतर स्मिथने संतप्त प्रतिक्रिया दिली. त्याने जमिनीवर बॅट मारली. तो त्याच्या विकेटवर पूर्णपणे नाराज दिसत होता. डावाच्या 64व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जडेजाने त्याचा बळी घेतला. स्मिथ 3 चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र होण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लक्षात घेता टीम इंडियाला या मॅचमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. हा सामना आपल्या नावावर करून भारतीय संघ पुन्हा एकदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. जर टीम इंडियाने हा सामना गमावला तर संघाला श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.