Download App

Asia Cup 2023 : टीम इंडियाला मोठा धक्का, आशिया कपमधून जसप्रीत बुमराह अचानक मायदेशी परतला

  • Written By: Last Updated:

Asia Cup 2023 : आशिया कप खेळणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कोलंबोहून मुंबईत आला आहे. यॉर्कर किंग तडकाफडकी माघारी गेल्यानं संघासाठी मोठा धक्का आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. बुमराहच्या अचानक कोलंबोहून मुंबईत परतण्याचे कारण काय हे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही, परंतु बुमराहचे भारतात परतणे हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी तसेच चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय.

पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये सध्या आशिया कपचे सामने सुरू आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पावसामुळे चाहत्यांचे लक्ष लागलेल्या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. अशातच आशिया कप सुरू असतानाच भारताला आणखी एक धक्का बसला आहे. आशिया कपमध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने होते. जसप्रीत बुमराह पाकिस्तानविरुद्ध फलंदाजीसाठी आला होता. मात्र, जसप्रीत बुमराहला पावसामुळे गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. आणि आता बुमराह भारतात परतला. भारतीय संघ सोमवारी नेपाळविरुद्ध खेळणार आहे. या मॅचमध्ये तो खेळणार नाही.

राखी सावंत आदिल खानविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार 

हा सामना इंडायने जिंकल्यावर सुपर-4 ची फेरी सुरू होणार आहे. आशिया चषक स्पध्रेत 6 सप्टेंबरपासून सुपर-4 फेरी होणार आहे.

आयर्लंड मालिकेतून परतला होता
नुकतेच जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन केले. या मालिकेत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कर्णधार होता. ही मालिका २-० ने टीम इंडियाने जिंकली होती. यापूर्वी जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मैदानापासून दूर होता. या कारणास्तव तो आयपीएल 2023 चा भाग नव्हता. जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती, मात्र आता तो परतल्यानं चाहत्यांची निराशा झाली आहे.

 

 

Tags

follow us