एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदी पुन्हा एकदा अजिंक्य नाईक यांची वर्णी लागली. इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर बुधवारी 12 नोव्हेंबरला उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि इतर पदांसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर आता निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.
माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. आव्हाडांसमोर उपाध्यक्षपदासाठी नितीश रेड्डी यांचं आव्हान होतं. मात्र, आव्हाडांनी नितीश रेड्डी यांचा मोठ्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. तसेच सदस्यपदी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी वर्णी लागली आहे. तर सहसचिव पदी निलेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. भोसले यांनी गौरव पय्याडे यांना पराभूत केलं आहे.
मोठी बातमी! मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
