मोठी बातमी, भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती
Chandrashekhar Bawankule : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर
Chandrashekhar Bawankule : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडणूक प्रमुखपदी निवड केली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांचे निवासस्थान वर्षा येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची देखील सध्या माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीप्रमाणे भाजपला (BJP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार तयारी केली असून मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रमुखपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपने बावनकुळे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना भाजपने विधानसभा 2024 च्या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत 120 पेक्षा जास्त जागांवर बाजी मारली होती.
दोषींना सोडणार नाही, दिल्ली बॉम्बस्फोटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या भाजपच्या महत्वपूर्ण बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
दिल्लीत बॉम्बस्फोट अन् पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावर, शांती प्रार्थना महोत्सवात होणार सहभागी
