Download App

IND vs AUS Test : अश्विनच्या फिरकीपुढे कांगारूंचे लोटांगण; भारताची विजयाकडे वाटचाल

  • Written By: Last Updated:

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. येथे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 177 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 400 धावांची मोठी धावसंख्या उभारली. तर दुसरीकडे कांगारुचा संघ ढेपाळला आहे. नागपूर कसोटीत टीम इंडिया विजयाकडे वाटचाल करत असून आता फक्त दोन विकेट्सची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावाला सुरुवात झाली असून ऑस्ट्रेलियाने केवळ 88 धावांवर 8 विकेट गमावल्या आहेत. रविचंद्रन अश्विनसमोर ऑस्ट्रेलियाचे सर्व फलंदाज अपयशी ठरले आहेत. अश्विनने या डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने कसोटी कारकिर्दीत 31व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा ही सलामीची जोडी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली. अश्विनने दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजाला वैयक्तिक 5 धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. 11व्या षटकात रवींद्र जडेजाने लबुशेनला बाद करून ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. 26 धावांवर कांगारूंनी दुसरी विकेट गमावली.

अश्विनने 14व्या षटकात वॉर्नरला बाद करून ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. हा सलामीवीर 10 च्या वैयक्तिक स्कोअरवर LBW आऊट झाला. 16व्या षटकात अश्विनने रेनशॉला LBW बाद करून भारताला चौथे यश मिळवून दिले. 16 व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाने चार विकेट गमावल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ 52 च्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये परतला, अश्विनने 6 च्या वैयक्तिक स्कोअरवर पीटर हँड्सकॉम्बला LBW बाद केले. अश्विनने अॅलेक्स कॅरीला LBW बाद करून 31वी 5 विकेट्स पूर्ण केली.

ऑस्ट्रेलियाने 64 धावांवर 6वी विकेट गमावली. रवींद्र जडेजाने पॅट कमिन्सला 1 च्या वैयक्तिक स्कोअरवर बाद करून भारताला 7 वे यश मिळवून दिले. मर्फीला बाद करत अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाला 8वा धक्का दिला. कांगारूंनी 75 धावांत 8वी विकेट गमावली.

ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय फिरकीपटूंसमोर ज्या प्रकारे शरणागती पत्करली आहे, त्यावरून हा सामना आजच संपतो की काय ? असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. दरम्यान अद्याप दीड सत्र बाकी असून ऑस्ट्रेलियाच्या 2 विकेट शिल्लक आहेत. जर कांगारू भारताची आघाडी पार करू शकले नाही तर ते आजच एका डावाने पराभूत होऊ शकतात.

तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी भारताने 321/7 धावसंख्येने सुरुवात केली, रवींद्र जडेजाची विकेट सुरुवातीलाच पडली. मात्र अक्षर पटेलने एका टोकापासून आघाडी राखली, आधी मोहम्मद शमी आणि नंतर मोहम्मद सिराजने अक्षरला चांगली साथ दिली. मोहम्मद शमीने 37 धावांची खेळी केली. टीम इंडियाला पहिल्या डावात 223 धावांची आघाडी मिळाली.

Tags

follow us