कपिलदेव ह्या भगिनींसाठी उभा राहिला. तेंडुलकर, कोहली काही बोलतात का पाहू? अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत.
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी कारवाईची मागणी केली आहे कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा वाढत चालला आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि क्रिकेटचा पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देवही (Kapil Dev) कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. नीरज चोप्रा यांनी एक ट्विट करत याप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी करून खेळाडूंना न्याय देण्याची मागणी केली आहे.
मौत के सौदागर ते विषारी साप; पंतप्रधान मोदींवर कॉंग्रेसची ‘एवढ्या’ वेळा आक्षेपार्ह टीका
याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात आज रस्त्यावर उतरले. पण सरकार खा. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करायला तयार नाही.
अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात आज रस्त्यावर उतरले. पण सरकार खा. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करायला तयार नाही.
तेंडुलकर, कोहली काही बोलतात का पाहू?
सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आत्ताच बातमी आलीं…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2023
याच ट्विटमध्ये ते म्हणतात की, “तेंडुलकर, कोहली काही बोलतात का पाहू? सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आत्ताच बातमी आली. कपिलदेव ह्या भगिनींसाठी उभा राहिला.” एकप्रकारे आपल्या ट्विटमधून त्यांनी सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांना प्रश्न विचारला आहे.
नीरज चोप्रा याने आज सकाळी ट्विट करत लैंगिक शोषण प्रकरणी न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या कुस्तीपटूंना समर्थन दिले. खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याचे पाहून वाईट वाटतंय. देशाचे प्रतिनिधीत्व आणि आपल्याला अभिमान वाटावी अशी कामगिरी करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे एक देश म्हणून आपली जबाबदारी आहे, मग तो खेळाडू असो किंवा नसो, असे नीरज चोप्रा याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) April 28, 2023
याच ट्विटमध्ये तो पुढे म्हणतो की जे घडत आहे ते घडायला नको होते. हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा असून तो निःपक्षपणे आणि पादरर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. न्यायासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाई करणे आवश्यक आहे.
देशाला क्रिकेटचा विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनीही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. बजरंग पुनियासह विनेश फोगाट आणि अन्य कुस्तीपटूंच्या पत्रकार परिषदेचा फोटो कपिल यांनी आपल्या स्टोरीवर ठेवला असून याखाली ‘त्यांना कधी न्याय मिळेल का?’, असा सवाल उपस्थित केला आहे.
https://letsupp.com/national/supreme-court-question-to-central-govt-39710.html