IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज के.एल.राहुल (KL Rahul)कसोटीतून बाहेर पडला आहे. राहुल दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे राहुलला विश्रांती दिली जाणार आहे. राहुलच्या जागी निवड समितीनं कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal )स्थान दिलं आहे. पडिक्कलला संघात स्थान दिल्यानं जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या शाळांसाठी इंद्राणी बालन फाऊंडेशनची तीन कोटींची मदत
भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये मालिकेतला तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने सांगितले की, उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी फिटनेसमुळे केएल राहुलला राजकोट येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. राहुलने 90 टक्के फिटनेस गाठला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तो प्रगती करत आहे.
चव्हाणांनी उद्या येतो सांगितलं अन्…; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यासाठी संपूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA)मध्ये उपचार सुरु ठेवणार आहे. निवड समितीनं 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी केएल राहुलच्या जागी देवदत्त पडिक्कलचा समावेश केला आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर , कुलदीप यादव , मोहं. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पडिक्कल.