चव्हाणांनी उद्या येतो सांगितलं अन्…; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

  • Written By: Published:
चव्हाणांनी उद्या येतो सांगितलं अन्…; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

Prithviraj Chavan On Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. अशातच आज चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांचा निर्णय पक्षातील अनेक सहकाऱ्यांसाठी धक्कादायक असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यानं पक्षालाही मोठा धक्का बसला. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाष्य केलं. अशोकराव चव्हाण असं निर्णय घेतीत असं वाटलं नाही, कालपर्यंत ते आमच्यासोबत होते, असं चव्हाण म्हणाले.

भाजपविरोधात युवक कॉंग्रेसचा मोर्चो पोलिसांनी अडवला, कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात 

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कालच आमचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आले होते. त्या बैठकीत राज्यसभेची रणनीती आणि लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा झाली. त्या बैठकीला अशोक चव्हाणही हजर होते. दुपारी चार वाजेपर्यंत ते आमच्यासोबत होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यात असं काही सुरू असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. जातांना ते बाळासाहेब थोरात यांना उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा बसून चर्चा करू, असं सागून गेले. काँग्रेसच्या जागा वाटपात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली होती. मविआत त्यांना महत्वाचं स्थान होतं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना 

ते म्हणाले, अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे आम्हाला दु:ख झालं आहे. पक्षाने त्यांना मोठ्या पदावर संधी दिली होती. मात्र सध्या भाजप ज्या पद्धतीने राजकारण करत आहे, त्यावरून त्यांच्यावर काही दबाव होता हे स्पष्ट आहे. भाजपकडून असे काही घडेल, याचं सुतोवाच होतं होतं. ते आज झालं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

कॉंग्रेसचे आणखी काही आमदार चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये येणार असल्याचं भाजप नेते सांगत आहेत. यावरही चव्हाण यांनी भाष्य केलं. काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांशी संपर्क साधण्यात आला. एकही आमदार त्यांच्यासोबत कुठेही जाणार नाही. भाजपकडून निव्वळ अफवा उडवल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube