भाजपविरोधात युवक कॉंग्रेसचा मोर्चो पोलिसांनी अडवला, कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

  • Written By: Published:
भाजपविरोधात युवक कॉंग्रेसचा मोर्चो पोलिसांनी अडवला, कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune News : काही दिवसांपासून अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, आज चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसला. चव्हाण यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. दरम्यान, भाजपकडून विरोधकांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाया, राज्यातील वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर पुण्यात युवक कॉंग्रेस आक्रमक झाली आहे.

चर्चेला पूर्णविराम! युपीमध्ये ‘इंडिया’ आघाडीला भगदाड; आरएलडीचे जयंत चौधरींचा एनडीएत प्रवेश 

भाजपचं पक्षफोडाफोडीचं राजकारण आणि राज्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात आज कॉंग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर आंदोलन करणार होते. मात्र, या कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी स्थानबद्ध केलं. सध्या कॉंग्रेस भवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. काँग्रेसची बाईक रॅलीही पोलिसांकडून अडवण्यात आली. यावेळी कार्यकर्यांनी युवक कॉंग्रेस जिंदाबाद… हुकुमशाही नही चलेगी, नही चलेगी… गुंडागिरी नही चलेगी, अशा घोषणा दिल्या.

जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना

भाजपने आतापर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष फोडून त्यातील गट आपल्या सोबत घेतले. त्यानंतर आता ऐननिवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक नेते एकामागून एक पक्ष सोडत आहेत. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. भाजपवाल्यांना निवडणूक लढवण्याची हिंमत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये फूट पाडली जातेय, असा आरोप विरोधक करत आहेत. शिवाय, गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी गोळीराच्य घटना घडल्या. पुण्यातही कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी पत्रकार निखिळ वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या विरोधात आता युवक कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राज्यातील वातावरण भंय़कर आहे. गृहमंत्री फडवीसांच्या काळात राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. पुण्यातील गुंडाराजला आळा का बसत नाही? वाढत्या गुन्हेगारींकडे गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे, अशा मागण्या यावेळी कार्यकर्त्यांनी केल्या.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube