चर्चेला पूर्णविराम! युपीमध्ये ‘इंडिया’ आघाडीला भगदाड; आरएलडीचे जयंत चौधरींचा एनडीएत प्रवेश

चर्चेला पूर्णविराम! युपीमध्ये ‘इंडिया’ आघाडीला भगदाड; आरएलडीचे जयंत चौधरींचा एनडीएत प्रवेश

Jayant Choudhari News : उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला भगदाड पडलं आहे. राष्ट्रीय लोकदल (आरएलडी)चे प्रमुख जयंत चौधरी (Jayant Choudhari) यांनी भाजपप्रणित एनडीएत प्रवेश केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मागील अनेक दिवसांपासून जयंत चौधरी एनडीएत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर जयंत चौधरी यांनी प्रवेश करत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या टाइमलेस टेल ऑफ रोमान्स Fitoor आठ वर्षे पूर्ण, आजही आठवतंय…

एनडीएमध्ये प्रवेश केल्यानंतर जयंत चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना जयंत चौधरी म्हणाले, मी माझ्या सर्व आमदारांशी बोललो आहे. परिस्थिती तशी असल्याने आम्हाला अल्पावधीतच हा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयात आमचे सर्व आमदार व कार्यकर्ते सोबत असल्याचे जयंत चौधरींनी स्पष्ट केलं आहे. जयंत चौधरी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असणार आहेत.

भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर, चित्रपटावरून पुण्यात राडा…

पंतप्रधानांच्या दूरदृष्टी आणि समर्पणामुळे असा निर्णय घेण्यात आला जो पूर्वीचे कोणतेही सरकार घेऊ शकले नाही. देशासाठी हा मोठा दिवस आहे. हा माझ्यासाठी भावनिक आणि संस्मरणीय क्षण आहे. मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारत सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी दूरदृष्टी दाखवून हा निर्णय घेतला आणि (चौधरी चरण सिंग) यांना भारतरत्न देऊन सन्मानित केलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Sonal Chauhan : बोल्ड आणि ब्युटीफुल ‘जन्नत’ फेम सोनल चौहानच्या ग्लॅमरस अदा

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक भाजपसोबत लढण्याशी संबंध जोडला जात असल्याबद्दल सन्मान असल्याचं विचारलं असता ते म्हणाले, निवडणुकीत आपण जिंकू किंवा हरलो, मी युती करणार की नाही, हा प्रश्न नाही, आजचा निर्णय लक्षात राहील. पिढ्यान्पिढ्या. हा निर्णय आहे. हे काँग्रेस पक्षाचे विधान असेल तर मी त्यावर टीका करत असल्याचं जयंत चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज