Download App

KKR vs DC : दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर KKR चा डाव गडगडला, दिल्लीला विजयासाठी 128 धावांचे आव्हान

  • Written By: Last Updated:

KKR vs DC : आयपीएलच्या 16व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) गोलंदाजांची कामगिरी अखेर मैदानावर पाहायला मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत कोलकाता संघाचा डाव 20 षटकांत 127 धावांत गुंडाळला. दिल्लीकडून गोलंदाजीत प्रदीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या इशांत शर्माचा अप्रतिम खेळ पाहायला मिळाला, त्याने केवळ 19 धावा देत 2 बळी घेतले. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांसमोर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी पूर्णपणे शरणागती पत्करली.

पाऊसामुळे उशिरा सुरु झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासूनच धुमाकूळ घातला. केकेआरने लिटन दासच्या रूपाने पहिली विकेट अवघ्या 15 धावांवर गमावली. यानंतर ठराविक अंतराने विकेट गेल्या.

लिटन दासनंतर मुंबईविरुद्ध सर्वोत्तम शतक झळकावणाऱ्या व्यंकटेश अय्यरला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी कर्णधार नितीश राणा केवळ 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जेसन रॉयने डाव सांभाळण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला मात्र त्याला कोणाचीही साथ मिळू शकली नाही.

क्रिकेट विश्वात खळबळ; फिक्सिंगसाठी भारताच्या ‘स्टार’ खेळाडूला मोठी ऑफर

सलग दोन झटपट विकेट पडल्यानंतर केकेआरला मनदीपकडून खूप आशा होत्या पण तोही केवळ 12 धावा करून परतला. अशाप्रकारे अवघ्या 64 धावांवर संघाने 5 विकेट गमावल्या. मधल्या फळीतील आंद्रे रसेलने काही आकर्षक फटके लगावत संघाची धावसंख्या 127 धावांपर्यंत पोहचवली.

दिल्लीकडून आयपीएलच्या 16व्या मोसमात पहिला सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने चार षटकांत केवळ 19 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय एनरिक नोरखिया, अक्सर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. याशिवाय मुकेश कुमारने एक विकेट घेतली.

Tags

follow us