Lakshmi N Mittal and Aditya Mittal announced acquire the Rajasthan Royals : आयपीएलमधील संघ राजस्थान रॉयल्स दीड महिन्यात दोनदा विकला गेला आहे. प्रसिद्ध स्टील उद्योजक लक्ष्मी एन मित्तल, मुलगा आदित्य मित्तल आणि अदार पूनावाला यांनी एकत्रितपणे हा संघ खरेदी केला आहे. 15 हजार 600 कोटी रुपयांना ही डील झाली आहे. अमेरिकेचे उद्योजक काल सोमानी यांच्या कंसोर्टियम कंपनी ही शर्यतीत होती. परंतु त्यांना माघार घेतल्यानंतर मित्तल आणि पूनावाला यांनी डील फायनल केली.
राजस्थान रॉयल्स या फ्रेंचायजीचे विदेशातील पर्ल रॉयल्स आणि बार्बाडोस रॉयल्स संघ आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), सीसीआय आयपीएल सर्वोच्च परिषदेच्या मंजुरीनंतर हा करार अंतिम होणार आहे. हा व्यवहार 2026च्या तिसऱ्या तिमाहीत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी सोमानी यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेतील एका कंपनीने 1.63 अब्ज अमेरिकी डॉलर्सची ऑफर दिली होती. परंतु सूत्रांनुसार, अनेक समस्यांमुळे ते ड्यू डिलिजन्स प्रक्रियेत अयशस्वी ठरले आहे. याबाबत एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. लक्ष्मी एन. मित्तल आणि आदित्य मित्तल यांनी आदर पूनावाला यांच्यासोबत मनोज बदाळे यांनी राजस्थान रॉयल्स विकत घेण्यासाठी एक निश्चित करार झाल्याची घोषणा केली आहे. या संघातील मित्तल कुटुंबाकडे 75 टक्के हिस्सा असणार आहे. आदर पूनावाला यांच्याकडे 18 टक्के हिस्सा असणार आहे. उर्वरित 7 टक्के हिस्सा मनोज बदाळे यांच्यासह विद्यमान गुंतवणूकदारांकडे राहणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या पुनर्गठित संचालक मंडळात लक्ष्मी एन. मित्तल, आदित्य मित्तल, वनिषा मित्तल-भाटिया, आदर पूनावाला आणि बदाळे यांचा समावेश असणार आहे.
तिसरे मालक कोण आहे ?
राजस्थान रॉयल्स संघाबरोबर बदाळे सुरुवातीपासून जोडलेले आहेत. एकेकाळी राजस्थान रॉयल्स ही फ्रेंचायजी स्वस्त असल्याचे बोलले जात होते. परंतु बदाळे यांनी राजस्थान रॉयल्स फ्रेंचायजीची ब्रँड व्हॅल्यू वाढविली आहे. राजस्थान रॉयल्सच्या मालकीचे दक्षिण आफ्रिकेतील पार्ल रॉयल्स आणि वेस्ट इंडीजमधील बार्बाडोस रॉयल्स हे संघ आहेत. लक्ष्मी मित्तल हे मूळचे राजस्थानमधील आहेत. यावर मित्तल म्हणाले मला क्रिकेट आवडते आणि माझे कुटुंब राजस्थानचे आहे, त्यामुळे आयपीएलमधील इतर कोणत्याही संघापेक्षा राजस्थान रॉयल्सचा भाग बनणे मला अधिक पसंत आहे.
