राजस्थान रॉयल्सची प्लेऑफमध्ये धडक; मुंबई हरल्याने पंजाब, केकेआरचे स्वप्न भंगले !

IPL 2026 playoffs-राजस्थानने आयपीएल 2026 प्लेआॅफमध्ये धडक मारलीय. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे.

  • Written By: Published:
Rajasthan Royal

IPL 2026 playoffs : राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मुंबई इंडियन्सवर ( Mumbai Indians) 30 धावांनी शानदार विजय मिळविला आहे. याचबरोबर राजस्थानने आयपीएल 2026 प्लेआॅफमध्ये धडक मारलीय. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या महत्त्वाच्या लढतीत राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 205 धावांचा मोठा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला 9 बाद 175 धावाच करू शकला. या विजयासह राजस्थानच्या खात्यात 14 लढतीत 16 पाँईट झाले आहे. त्यामुळे हा संघ प्लेऑफमध्ये (playoffs) पोहोचणारा चौथा आणि अखेरचा संघ ठरला आहे. राजस्थान रॉयल्स आता एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरणार आहे. तर क्वालिफायर एकमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमने-सामने भिडणार आहेत.


गुरिंदरवीर सिंह देशातील सर्वाधिक वेगवान धावपटू! दोन मिनिटात राष्ट्रीय विक्रम मोडले


राजस्थानची दमदार फलंदाजी

राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात केली. त्याने 17 चेंडूत 27 धावा करत 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. मात्र त्यानंतर वैभव सूर्यवंशी 4 आणि कर्णधार रियान पराग 14 धावांवर बाद झाल्याने राजस्थान अडचणीत आला आहे. पॉवरप्लेमध्ये राजस्थानच्या 3 बाद 54 धावा झाल्या होत्या. यानंतर ध्रुव जुरेल, दासुन शनाका आणि जोफ्रा आर्चर यांनी छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे संघाचा 200 धावांच्या पुढे नेले. जुरेलने 26 चेंडूत 38, शनाकाने 15 चेंडूत 29, तर आर्चरने अवघ्या 15 चेंडूत 32 धावांची तडाखेबंद खेळी केली. शेवटी जडेजाने 19 आणि नांद्रे बर्गरने 10 धावा करत संघाची धावसंख्या 205 पर्यंत पोहोचवली आहे. मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.


संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल; महाराष्ट्रातील 5 खासदारांना जाहीर झाला प्रतिष्ठेचा संसदरत्न’ पुरस्कार


प्रत्युत्तरात मुंबईची खराब सुरुवात

206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा भोपळा फोडू शकला नाही. . त्यानंतर नमन धीर, रायन रिकेल्टन आणि तिलक वर्मा देखील झटपट बंद पडले. पॉवरप्लेमध्ये मुंबईने 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 38 चेंडूत 63 धावांची भागीदारी केली. जॅक्सने 33 धावा केल्या, तर हार्दिक पंड्याने मैदानात येताच आक्रमक फलंदाजी करत 15 चेंडूत 34 धावा ठोकल्या. सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावत 60 धावांची झुंजार खेळी केली. मात्र 16व्या षटकात हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर मुंबई संकटात आला. त्यानंतर सूर्यकुमार यादवही बाद झाला आणि मुंबईच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाला आहे. जोफ्रा आर्चरच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज टिकू शकले नाहीत आणि राजस्थानने प्लेऑफचे तिकीट निश्चित केले आहे.

follow us