राज कुंद्राची पत्रकार परिषद स्थगित; राजस्थान रॉयल्सच्या आरोपांवर करणार होते खुलासा

राज कुंद्राची पत्रकार परिषद स्थगित; राजस्थान रॉयल्सच्या आरोपांवर करणार होते खुलासा

Raj Kundra press conference postponed reveal Rajasthan Royals allegations : राजस्थान रॉयल्स या आयपीएलमध्ये क्रिकेटचा संघावर काही आरोप करण्यात आलेले आहेत. त्यावर व्यावसायिक आणि राजस्थान रॉयल्सचे माजी सहमालक राज कुंद्रा हे या आरोपांवर खुलासा करण्यासाठी आज 2 जून रोजी पत्रकार परिषद घेणार होते. मात्र ही पत्रकार परिषद स्थगित करण्यात आली आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

व्यावसायिक आणि राजस्थान रॉयल्सचे माजी सहमालक राज कुंद्रा हे आज 2 जून रोजी पत्रकार परिषद घेणार होते. मात्र ही पत्रकार परिषद स्थगित करण्यात आली आहेत. यामध्ये ते राजस्थान रॉयल्स या आयपीएलमध्ये क्रिकेटचा संघावर काही आरोप करण्यात आलेले आहेत. या आरोपांवर खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार होते.

Amruta Khanvilkar : अमृताने आईच्या वाढदिवसाची खास झलक केली शेयर

यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या एका प्रमोटरविरूद्ध अर्थिक फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि विश्वासघात केल्या प्रकरणी काही दस्ताऐवज आणि पुरावे सादर केले जाणार होते. हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे इमर्जिंग मिडीया व्हेंचर्स लिमिटेड आणि मनोज कुमार बडाले यांनी लंडनवरून हाय कोर्टतून विना पूर्व सूचना देत कोर्टाकडून तात्पुरता आदेश मिळवला. ज्यानुसार राज कुंद्रा यांना या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यापासून रोखण्यात आले आहे.

‘पैसे बुडवले, धमक्या दिल्या…’, हगवणे कुटुंबीयांनी चित्रपट दिग्दर्शकांना फसवलं, थेट पुरावेच समोर

राज कुंद्राची कायदेशीर टीम याला आता आव्हान देत आहे. यासाठी एक याचिकादेखील करण्यात येणार आहे. कारण याचिकार्त्यांनी कोर्टाला कोणतही सत्य सांगितलेलं नाही. कोर्टाचा वापर सत्य लपवण्यासाठी केला आहे. मात्र हा आदेश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे. तसेच हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे.

लघुशंकेवरून वाद! जामखेडमध्ये तरुणावर गोळीबार, ६ जणांना चोवीस तासाच्या आत अटक

यावर बोलताना राज कुंद्रा यांनी सोशल मिडीयावर लिहिले की, मी घाबरणार नाही आणि गप्प बसणार नाही. सत्य समोर येईलच. हा खेळ जेंटलमनचा आहे. मात्र पडद्यामागे काही वेगळच आहे. यावर पत्रकार परिषद घेणे योग्य नाही पण हे प्रकरणं संपलेलं नाही. असं राज कुंद्रा म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube