‘पैसे बुडवले, धमक्या दिल्या…’, हगवणे कुटुंबीयांनी चित्रपट दिग्दर्शकांना फसवलं, थेट पुरावेच समोर

‘पैसे बुडवले, धमक्या दिल्या…’, हगवणे कुटुंबीयांनी चित्रपट दिग्दर्शकांना फसवलं, थेट पुरावेच समोर

Hagawane Family Cheating Film Director Avinash Khochare : हगवणे कुटुंबियांचे दररोज नवीन कारनामे समोर (Hagawane Family) येत आहे. आता हागवणेंनी चित्रपट क्षेत्रात सुद्धा पैसे (Film Director) लावले असल्याचं समोर आलंय. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने आरोप केलाय की, धमक्या देऊन लाखो रूपयांना फसवलं. ‘खुर्ची’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील (Pune News) होते. तर चित्रपटाचं पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लाँच करण्यात आलं होतं. पत्रकार परिषदेत पुरावे दाखवत त्यांनी अविनाश खोचरे यांनी हगवणे कुटुंबावर आरोप केला आहे.

अॅड. वाजिद खान बिडकर यांनी यासंबंधी पत्रकार परिषदेत सांगितलं की, खु्र्ची हा एक मराठी चित्रपट आहे. अविनाश खोचरे हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. फौजदारी स्वरूपाचं प्रकरण न्यायालयात दाखल करणार (Avinash Khochare Allegations) असल्याचं देखील वकिलांनी सांगितलं. हा खोचरे यांचा पहिला चित्रपट होता. तो पूर्ण झाल्यावर पोस्टर वरून नावच गायब करण्यात आलं. तसेच पुरावे सादर करू नये म्हणून धमक्या देण्यात आल्या, असा आरोप अविनाश खोचरे यांनी केलाय.

मला दुसरं बाळ झालं तर ती…अभिनेता रणबीर कपूरने जाहीर केली इच्छा, आलिया पुन्हा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा

चित्रपटाचं अॅग्रीमेंट, मेकिंगचे फोटो आणि व्हिडिओ आहेत. पोस्टर लॉंच झालं होतं, त्याचेही फोटो आहेत. त्यामध्ये दिग्दर्शक म्हणून मी आहे. त्यानंतर हे सर्व पुरावे प्रॉडक्शन टीमच्या लॅपटॉपमधून काढून टाकण्यात आले. पण माझ्या मोबाईलमध्ये ते पुरावे आहेत. संतोष वसंत हगवणे यांच्यावर खोचरे यांनी हा आरोप केलाय. तर चित्रपटात वापरलेली गाडी शशांक हगवणे यांची असल्याचं खोचरे यांनी सांगितलं आहे.

बंदूक हातात घेत नाही पण… कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा कोण ?

संतोष हगवणे यांच्यासोबत हा व्यवहार झाला होता. कोर्टात केस चालू आहे. चित्रपट तयार झाल्यानंतर त्यांनी माझं नाव काढलं. पहिल्यापासून त्यांना फोकस आवडत होता. चित्रपट झाल्यानंतर दोन कलाकार बिग बॉसमध्ये गेले. त्यामुळे त्यांना वाटलं असेल की, जर चित्रपट मोठा झाला तर मी बिग बॉसमध्ये जावू शकतो. माझं चित्रपटासाठी असलेलं क्रेडिट हवंय. त्यांनी म्हटलंय की, आम्ही त्याला चित्रटात घेतलेलं नाही, तो एडिट करून वापरतोय, असा आरोप त्यांनी केलाय.

राजेंद्र हगवणे यांच्यासोबत वाद नाही, ते सेटवर आले आणि त्यांनी पूजा केली. त्यांचा माझा काही वैयक्तिक वाद नाही, असं देखील अविनाश खोचरे यांनी म्हटलंय. माझ्या जीवाच्या भीतीने मी अनेक गोष्टी बोलत नाही, असं अविनाश खोचरे यांनी म्हटलंय. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांकडून धमकावण्याचा प्रयत्न केला गेला. 16 डिसेंबर 2023 ला न्यायालयात या संदर्भात कोर्टात दावा दाखल केला. चित्रपटाने 2 कोटीपर्यंत कमाई केली, मला काहीच मिळाले नाही असे आरोप अविनाश खोचरे यांनी केले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या