लघुशंकेवरून वाद! जामखेडमध्ये तरुणावर गोळीबार, ६ जणांना चोवीस तासाच्या आत अटक

अहिल्यानगर : जामखेड (Jamkhed) येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. १ जून) रात्री साधारण १० वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची (Firing) घटना घडली. तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना, फिर्यादीने येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला. यामधील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आतमध्ये गजाआड केले.
जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री १० वाजता विंचरणा नदीजवळ त्यांच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका वाहनातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी संबंधित ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितले. मात्र या बोलण्यचाचा राग मनात धरून त्या अज्ञात व्यक्तींनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय २०, रा. जामखेड) हा युवक आला. त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात आरोपींनी कुणाल आणि आदित्य यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. गोळीबारात कुणाल जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली तपास यंत्रणा कार्यरत केली. हा गुन्हा प्रभू रायभान भालेकर (राहणार संभाजीनगर) आणि त्याच्या साथीदारांनी केला असून ते नेवासा मार्गाने गेल्याचं कळतात पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले.
शर्वरी यंग फिट इंडिया आयकॉन म्हणून नियुक्त; सायकलिंगच्या माध्यमातून फिटनेस आणि पर्यावरणाचा संदेश
सहा आरोपींना घेतले ताब्यात…
यामध्ये पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापळा रचुन प्रभू रायभान भालेकर (वय ३३, रा.निपाणी, छत्रपती संभाजीनगर), नकुल विष्णु मुळे (वय ४०, रा.खेर्डा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), शरद अंकुशराव शिंदे (वय ३८, रा.पुसेगाव, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), गणेश गोविंद आरगडे (वय ३०, रा.खंडाळा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), रावबहादुर श्रीधर हारकळ (वय ३५, रा.सारासिध्दी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर), सुशील ताराचंद गांगवे (वय ३०, रा.पद्यपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशांना ताब्यात घेतले आहे.
या आरोपींना अटक करून मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक टपस जामखेड पोलीस स्टेशन करत आहे.