Diogo Jota News : फुटबॉल जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्पेनमध्ये एका फुटबॉल खेळाडूचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या खेळाडूचा विवाह झाला होता. डियोगो जोटा (Diogo Jota)असे या पोर्तुगाली खेळाडूचे नाव आहे. हा अपघात आज उत्तर पश्चिम स्पेनमधील (Spain News) जमोरा नजीक झाला. या दुर्घटनेत जोटाचा भाऊ आंद्रे सिल्वा याचा देखील मृत्यू झाला आहे.
Liverpool FC player Diogo Jota was killed when his Lamborghini suffered a tire blowout while overtaking another car, causing it to leave the road and catch fire – BBC
— BNO News Live (@BNODesk) July 3, 2025
रॉयटर्सनुसार जोटा आणि त्याचा भाऊ लँबोर्गिनी कारमधून प्रवास करत होते. याच दरम्यान उत्तर पश्चिम स्पेनमधील जमोरा भागात त्यांच्या कारचे टायर अचानक फुटले. यामुळे कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या खाली मोठ्या खड्ड्यात कोसळली. खड्ड्यात पडताच कारने पेट घेतला. या आगीत दोन्ही भावांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी लागलीच मदतकार्य सुरू केले. जोटाचे दहा दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. या विवाहाचे खास फोटो त्याने नुकतेच सोशल मीडियावरही (Social Media) शेअर केले होते.
बर्मिंगहॅम टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह का नाही? कर्णधार शुभमन गिलने केला मोठा खुलासा
पोर्तुगालच्या या खेळाडूने मागील हंगामात लिव्हरपूलला प्रीमियर लीग विजेतेपद मिळवण्यात मोलाचं योगदान दिलं होतं. लिव्हरपुलच्या आधी त्याने जून महिन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कप्तानीत पोर्तुगालला नेशन्स लीगमधील फायनल सामना जिंकून देण्यातही महत्वाची भूमिका बजावली होती. जोटाने सप्टेंबर 2020 मध्ये 40 मिलियन पाउंडपेक्षाही जास्त रक्कम वॉल्वरहॅम्प्टन वांडरर्सला सोडून लिव्हरपूलबरोबर करार केला होता. या दरम्यान 2021-22 मध्ये एफए कप आणि लीग कप जिंकण्यात यशस्वी ठरला होता.
जोटा क्लिनिकल फिनिशिंग आणि ड्रिब्लिंग क्षमतेसाठी ओळखला जात होता. तो फॉरवर्ड आणि विंगर या दोन्ही पोजिशनमध्ये खेळत होता. सामन्याच्या दरम्यान जोटा कायम सतर्क असायचा. याच कारणामुळे तो एक आक्रमक फुटबॉल खेळाडू म्हणून नावारुपास आला होता.