Download App

Ahmednagar Kusti Spardha : अंतिम लढतीत शिवराज जखमी, महेंद्र गायकवाड ठरला ‘छत्रपती शिवराय केसरी’ चा मानकरी

  • Written By: Last Updated:

Mahendra Gaikwad VS Shivraj Rakshe : अहमदनगर येथील छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम निकाली कुस्तीत महेंद्र गायकवाडने सोन्याची गदा पटकावण्याचा मान मिळवला आहे. कुस्ती सुरू झाल्यापासूनच खिलाडी वृत्ती दाखवत सोलापूरचा महेंद्र गायकवाड याने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर कब्जा मिळवत होता. दोन्ही दिग्गज मल्लांमध्ये जवळपास 10 मिनिटे ही निकाली कुस्ती सुरू होती. या 10 मिनिटांमध्ये शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात चांगलीच धरपकड सुरू होती. अखेर महेंद्रच्या मजबूत पकडीनंतर अचानक शिवराजला त्रास झाल्याने जखमी झाला. शिवराजला गंभीर त्रास होत असल्याचं समजताच त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर आयोजकांकडून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विजयी घोषित केले.

ही अंतिम निकाली कुस्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लावण्यात आली. छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा 21 ते 23 एप्रिलदरम्यान अहमदनगरच्या वडियापार्क मैदानात पार पडली. जवळपास बाराशे मल्ल या कुस्ती स्पर्धेसाठी हजर झाले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी 2023 चा विजेता शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक, महेंद्र गायकवाड आशा दिग्गज मल्लानी सहभाग घेतला होता.

Uddhav Thackeray : भगव्याला कलंक लावणारे हात राजकारणातून कायमचे गाडून टाका

ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवराय केसरीच्या विजेत्यास अर्धा किलोची सोन्याची गदा म्हणजेच जवळपास 35 लाख रुपये किमतीचे बक्षीस देण्यात आले.

अहमदनगरच्या वडियापार्क येथे झालेल्या या कुस्ती स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,राम शिंदे, अभय आगरकर, सुवेंद्र गांधी दिलीप सातपुते, अनिल शिंदे, संग्राम शेळके, वैभव लांडगे, काका पवार, प्रशांत लहारे, जिल्हा तालीम संघ उपाध्यक्ष अभिषेक भगत आदी उपस्थित होते. परंतु यावेळी भाजपनेते शिवाजी कर्डीले उपस्थित नव्हते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Tags

follow us