Download App

महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून होणार निवृत्त? ‘या’ खेळाडूने दिले संकेत

मुंबई : कॅप्टन कुल म्हणून नावाजलेला तसेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. यंदाची टी 20 लीग स्पर्धा धोनीची अखेरची असणार आहे. त्यानंतर धोनी टी 20 लीग स्पर्धेतून निवृत्त होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन याने दिली आहे. धोनीने 2008 साली या स्पर्धेत एंट्री केली होती. चेन्नईसाठी खेळणाऱ्या धोनीने आजवर संघाला चारवेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेने त्याचे चाहते निराश होणार आहे.

धोनीच्या निवृत्तीबाबत बोलताना दिग्गज खेळाडू हेडनने म्हटलं की, यंदाचे वर्ष एम एस धोनीसाठी हे खूप खास असणार आहे. हे वर्ष देखील जल्लोषात साजरं केलं जाणार आहे. यंदाची टी 20 लीग स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती घोषीत करू शकतो. धोनीने निवृत्ती घोषीत केल्यानंतर चाहते आणि चेन्नई संघाकडून धोनीला भरभरून प्रेम दिलं जाईल.

यशस्वी कर्णधार म्हणून नावाजलेला
कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी हा टी 20 लीग स्पर्धेतील एक यशस्वी कर्णधार आहे. धोनीने त्याच्या कारकिर्दीत चेन्नई संघाला एक दोन वेळा नव्हे तर तब्बल 4 वेळा चॅम्पियनपॅड मिळवून दिले आहे. धोनीने चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. यामुळे त्याच्याकडे एक यशस्वी कर्णधार म्हणून पहिले जाते.

आरोग्य विभागाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना

जाणून घ्या धोनीची कारकीर्द
टी 20 लीग स्पर्धेत धोनीने आतापर्यंत एकूण 234 सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 4 हजार 978 धावा केल्या असून यामध्ये 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच धोनीने 229 सिक्स लगावले आहे. तसेच धोनीची हेलिकॉप्टर शॉट हा देखील त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडत असतो.

OYO Founder : ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे 20 व्या मजल्यावरून पडून निधन

दरम्यान येत्या 31 मार्चपासून टी 20 लीगचा थरार सुरु होणार आहे. यामुळे यंदाचे वर्ष हे महेंद्रसिंग धोनीसाठी नक्कीच विशेष ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान धोनी निवृत्तीची घोषणा करणार का? याकडे सध्या त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us