Matthew Breetzke : पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू असणाऱ्या त्रिकोणी मालिकेच्या (Triangular Series) दुसऱ्या सामन्यात न्युझीलंडविरुद्ध (New Zealand) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) युवा फलंदाज मॅथ्यू ब्रिट्झकेने (Matthew Breetzke) इतिहास रचला आहे. त्यांने आपल्या डेब्यू सामन्यात क्रिकेटच्या 54 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीही न घडलेले काम केले आहे.
लाहोरमध्ये न्युझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सहा विकेट्स गमावून 304 धावा केल्या, आपला पहिला सामना खेळत असलेल्या मॅथ्यू ब्रिट्झकेने दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरूवात करत 150 धावा केल्या. त्याने 148 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 150 धावा केल्या. यासोबतच एकदिवसीय (ODI Cricket) पदार्पणात 150 धावांचा टप्पा गाठणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
Matthew Breetzke!! 🌟🔥👏 First ever player to score 150+ on ODI debut.
Phenomenal, just phenomenal 🏏💥.#WozaNawe #BePartOfIt #NZvSA pic.twitter.com/8SjcG74FvM
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 10, 2025
1971 पासून सुरू असणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या 54 वर्षांच्या इतिहासात एखाद्या फलंदाजाने पदार्पणातच ही कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दुसरीकडे एकदिवसीय पदार्पणात शतक करणारा तो चौथा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कॉलिन इंग्रामने (Colin Ingram) 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध, बावुमाने 2016 मध्ये आयर्लंडविरुद्ध आणि रीझा हेड्रिक्सने 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पणात शतक झळकावले होते.
… तेव्हा मुंडे साहेब वेगळा पक्ष काढणार होते, छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा
मॅथ्यूने दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी आणि टी-20 पदार्पण केले आहे. त्याने त्याच्या देशासाठी एक कसोटी सामना खेळला आहे. तो ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध हा कसोटी सामना खेळला होता ज्यामध्ये त्याने फक्त एकाच डावात फलंदाजी केली आणि चार धावा केल्या. त्याने त्याच्या देशासाठी 10 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 16.77 च्या सरासरीने आणि 122.76 च्या स्ट्राईक रेटने 151 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक अर्धशतकही आहे.