MLC 2023: मुंबई इंडियन्सचा अटकेपार झेंडा, न्यूयॉर्कमध्ये चालवणार क्रिकेट संघ

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या फ्रँचायझीने आता केवळ भारतातच नाही तर अमेरिकेत देखील आपला संघ बनवला आहे. अमेरिकेत एक क्रिकेट लीग (American cricket league) सुरू होणार आहे, ज्याचे नाव मेजर लीग क्रिकेट आहे. (MLC 2023) या लीगमध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाची […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (56)

MLC 2023

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या फ्रँचायझीने आता केवळ भारतातच नाही तर अमेरिकेत देखील आपला संघ बनवला आहे. अमेरिकेत एक क्रिकेट लीग (American cricket league) सुरू होणार आहे, ज्याचे नाव मेजर लीग क्रिकेट आहे. (MLC 2023) या लीगमध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाची धुरा सांभाळणार आहे.

मेजर क्रिकेट लीग, यूएसएमध्ये सुरू होत असलेल्या क्रिकेट स्पर्धेत एकूण 6 फ्रँचायझींनी भाग घेतला. ज्यामध्ये भारतातील एकूण 4 फ्रँचायझींनी भाग घेतला आहे. या संघांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या संघांचा समावेश आहे. या लीगमध्ये गुंतवणूक करणारी पहिली भारतीय फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्स होती. केकेआरने लॉस एंजेलिस संघावर बाजी मारली.

आयपीएलच्या 4 संघांनी भाग घेतला

दिल्लीचा संघ सिएटल फ्रँचायझी संघ चालवणार आहे. त्याचवेळी, या लीगमधील तिसरा भारतीय संघ चेन्नई सुपर किंग्ज आहे. चेन्नई सुपर किंग्जसह अमेरिकेतील स्थानिक गुंतवणूकदारांनी एलास फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक केली. शिवाय आयपीएलचा चौथा संघ मुंबई इंडियन्स आहे.

मुंबई इंडियन्सने न्यूयॉर्क संघावर बोली लावली आहे, जो जुलैपासून सुरू होणाऱ्या या नव्या क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी ही जगातील पाचवी फ्रेंचाइजी असणार आहे. याअगोदर देखील मुंबई इंडियन्सने आयपीएल, (आयपीएल), एमआय केपटाऊन (एसए२०), एमआय एमिरेट्स (आयएलटी २०) आणि मुंबई इंडियन्स (डब्ल्यूपीएल) वर बेट लावले जाणार आहे.

IND vs AUS : भारताचा लाजिरवाणा पराभव, दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून विजय

यावर नीता अंबानी म्हणाल्या की, वाढत्या एमआय कुटुंबात आमच्या न्यू यॉर्क फ्रँचायझीचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. ते पुढे म्हणाले, मला आशा आहे की अमेरिकेच्या या पहिल्या क्रिकेट लीगमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंबई इंडियन्स हा जगातील एक मोठा जागतिक क्रिकेट ब्रँड बनणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी ही एक नवीन सुरुवात आहे आणि मी पुढच्या प्रवासाची वाट पाहत आहे.

Exit mobile version