IND vs AUS : भारताचा लाजिरवाणा पराभव, दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून विजय
विशाखापट्टणम : तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. विशाखापट्टणममधील या विजयासह कांगारू संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे. आता त्यांनी मालिका 1 -1 अशी बरोबरीत आली आहे. तिसरा आणि शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. मिचेल मार्शने 36 चेंडूत 66 आणि ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत 51 धावा केल्या. मार्शने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. हेडने 10 चौकार मारले.
केवळ एक हजार रुपयात घरपोच वाळू देणार, महसूल मंत्री विखेंची मोठी घोषणा
भारताचा अर्धा संघ पॉवरप्लेमध्ये (प्रारंभिक 10 षटके) पॅव्हेलियनमध्ये परतला. ना रोहित शर्मा चालला ना हार्दिक पांड्या. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. परिस्थिती अशी होती की 11 पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावा केल्या. त्याचवेळी अक्षर पटेलने नाबाद 29 धावा करत संघाला 100 धावांच्या पुढे नेले. रवींद्र जडेजाने 16 आणि रोहित शर्माने 13 धावा केल्या. केएल राहुल नऊ आणि हार्दिक पांड्या केवळ एक धाव करू शकले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने पाच आणि शॉन अॅबॉटने तीन बळी घेतले. नॅथन एलिसला दोन यश मिळाले.