Download App

IND VS AUS : भारताच्या महान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीचे नाव सामील, कपिल देवला टाकले मागे

IND VS AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND VS AUS) पहिला कसोटी सामना नागपुरातील जामठा स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस असून दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे. (IND VS AUS 1st Test) ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 2 बाद 81 धावा केल्या. मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ हे नाबाद राहिले.

डेव्हिड वॉर्नर एक धाव काढून बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बोल्ड केले. शमीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 400 वी विकेट घेतली. (Cricket) त्याअगोदरच उस्मान ख्वाजा पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. त्यामुळे ख्वाजाला नाबाद घोषित केले. अशा परिस्थितीत नवोदित केएस भरतने कर्णधार रोहित शर्माला डीआरएस घेण्याचा सल्ला दिला. डीआरएसचा निर्णय हा आपल्या बाजूने लागला.

पहिला सामना सुरु झाला. यामध्ये 76 धावा झाल्या. तर दोन विकेटही पडल्या. सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय वेगवान गोलंदाजांनी कांगारू संघाला दोन धावा देत दोन मोठे धक्के दिलेत. उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर प्रत्येकी एका धावेवर पॅव्हेलियनमध्ये परतले. अशा परिस्थितीत मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी खेळ सांभाळला. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली.

टीम इंडिया 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली. कर्णधाराने सूर्या आणि केएस भरत यांना पदार्पण देण्याचा निर्णय घेतला. 1980 नंतर प्रथमच 2 ऑफ स्पिनर संघात खेळत आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रॅनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), नॅथन लियॉन, टॉड मर्फी आणि स्कॉट बोलँड.

Tags

follow us