Download App

विराट कोहलीचे शतक, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

तिरुअनंतपुरम : भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार फलंदाजी करताना 85 चेंडूत कारकिर्दीतील 74 वे शतक ठोकले.

पहिल्या 63 धावा करताच कोहलीने महेला जयवर्धनेला मागे सोडले. यानंतर किंग कोहलीने शतक झळकावताच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. कोहलीने भारतीय भूमीवर 21 वे शतक ठोकले आणि घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

सचिन तेंडुलकरने 2011 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय भूमीवर शेवटचे शतक झळकावले होते. विराट कोहलीने हा विक्रम मोडला आणि आपल्या देशात सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणारा नंबर 1 फलंदाज बनला.

भारतीय भूमीवर सर्वाधिक एकदिवसीय शतके
1.103 सामन्यात 21 शतके – विराट कोहली
2.164 सामन्यात 20 शतके – सचिन तेंडुलकर
3. 69 सामन्यात 14 शतके – हाशिम आमला
4.153 सामन्यांमध्ये 13 शतके – रिकी पॉन्टिंग
5.110 सामन्यांमध्ये 12 शतके – रॉस टेलर

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने महेला जयवर्धनेला मागे टाकले आणि त्याने 63 धावा करताच पाचव्या क्रमांकावर पोहोचला. महेला जयवर्धनेने 448 सामन्यात 12650 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 19 शतके आणि 77 अर्धशतके केली आहेत. दुसरीकडे, किंग कोहलीने त्याचा विक्रम मोडत हा आकडा पार केला आहे.

Tags

follow us