Download App

मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार प्रदान, या पुरस्काराचा मानकरी ठरल्याबद्दल शमी म्हणाला…

National Sports Awards 2023 Ceremony: क्रिकेटर मोहम्मद शमी (Mohammed Shami Arjuna Award), शीतल देवी (Sheetal Devi) यांच्यासह 26 खेळाडूंना आज अर्जुन पुरस्कारानं (Arjuna Award) सन्मानित करण्यात आले. (National Sports Awards ) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात पुरस्कार टाळ्यांच्या मोठ्या गजरात वितरण पार पडलं.

बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांची 2023 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने बॅडमिंटनमध्ये आपले आणि देशाचे पहिले सुवर्णपदक जिंकले. याशिवाय आशियाई चॅम्पियनशिप आणि इंडोनेशिया ओपनचे विजेतेपदही पटकावले. सध्या मलेशिया ओपन सुपर 1000 मध्ये खेळत असल्याने ही जोडी समारंभाला उपस्थित राहू शकली नाही.

2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार
1. ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)
2. अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)
3. श्रीशंकर एम (अॅथलेटिक्स)
4. पारुल चौधरी (अॅथलेटिक्स)
5. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
6. आर वैशाली (बुद्धिबळ)
7. मोहम्मद शमी (क्रिकेट)
8. अनुष अग्रवाला (अश्वस्वार)
9. दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज)
10. दिक्षा डागर (गोल्फ)

11. कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)
12. पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी)
13. पवन कुमार (कब्बडी)
14. रितू नेगी (कब्बडी)
15. नसरीन (खो-खो)
16. सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स)
17. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग)
18. सुश्री ईशा सिंग (नेमबाजी)
19. हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)
20. अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
21. सुनील कुमार (कुस्ती)
22. सुश्री अँटिम (कुस्ती)
23. नौरेम रोशिबिना देवी (वुशू)
24. शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
25. इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
26. प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)

अफगाणिस्तान मालिकेतून डच्चू, विश्वचषकातील एन्ट्रीही डळमळीत; ‘या’ 5 खेळाडूंचे भवितव्य धोक्यात

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

1. ललित कुमार (कुस्ती)
2. आर.बी. रमेश (बुद्धिबळ)
3. महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स)
4. शिवेंद्र सिंग (हॉकी)
5. गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023

1. चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन)
2. रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)

follow us

वेब स्टोरीज