मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार दिला जाणार; साजिद नाडियाडवालांची कहाणी जिवंत केल्याबद्दल सन्मान

मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार दिला जाणार; साजिद नाडियाडवालांची कहाणी जिवंत केल्याबद्दल सन्मान

Murlikant Petkar will be honored with Arjuna Award : मुरलीकांत पेटकर (Murlikant Petkar) यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. साजिद नाडियाडवाला यांची कहाणी चित्रपटाच्या रूपात जिवंत केल्याबद्दल त्यांचा सन्मान (Arjuna Award) करण्यात येणार आहे. भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते दिग्गज मुरलीकांत पेटकर यांची कहाणी नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटचे प्रमुख साजिद नाडियाडवाला यांनी मोठ्या पडद्यावर जिवंत (Entertainment News) केली.

रक्तानं माखलेलं शरीर अन् सोबत चिमुकला तैमूर, डॉक्टरांनी सांगितलं सैफ हॉस्पीटलमध्ये आला, तेव्हा…

मुरलीकांत पेटकर यांना त्यांच्या कामगिरीच्या 52 वर्षांनंतर अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) देऊन सन्मानित केले जाईल, अशी घोषणा नुकतीच करण्यात आलीय. या प्रतिष्ठित कामगिरीबद्दल मुरलीकांत पेटकर म्हणाले की, प्रतिष्ठित अर्जुन जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मी खरोखरच भारावून गेलो आहे. त्याबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे. हा सन्मान केवळ वैयक्तिक कामगिरी नाही तर अनेक चांगल्या व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नांचे आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याचं देखील पेटकर यांनी सांगितलंय.

VIDEO : सोनेरी डोळे अन् सावळा रंग, महाकुंभात आणखी एक ‘सुंदरी’…गर्दीचं वेधलं लक्ष

मी साजिद नाडियाडवालाजींचे मनापासून आभार मानू इच्छितो, ज्यांनी माझ्या कथेवर केवळ विश्वास ठेवला. चंदू चॅम्पियन चित्रपटाद्वारे ती मोठ्या पडद्यावर जिवंत करण्यासाठी आपला विश्वास आणि संसाधने देखील लावली. त्याच्या अपाठिंब्याने सगळं बदललं. मोठ्या पडद्यावरचा माझा प्रवास सर्वात प्रामाणिक पद्धतीने सादर करणाऱ्या कबीर खान यांच्या प्रयत्नांचाही मी उल्लेख करू इच्छितो. कार्तिकला, ज्याने माझी कहाणी सर्वोत्तम पद्धतीने सादर केली. हा क्षण जितका माझा आहे तितकाच त्यांचाही आहे, मी संपूर्ण चंदू चॅम्पियन टीमचा खरोखर आभारी आहे. त्यांनी हा चित्रपट बनवला आणि माझ्या कथेद्वारे देशातील अनेक लोकांना प्रेरणा दिली.

क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू खेळाडू मुरलीकांत पेटकर यांनी पॅरा-स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यापूर्वी अनेक खेळांमध्ये भाग घेतला. तो ऐतिहासिक यश आणि धैर्याचे खरे प्रतीक म्हणून उदयास आला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube