Ravichandran Ashwin announces retirement from international cricket after Gabba Test : भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गाबा कसोटी संपताच अश्विनने निवृत्ती जाहीर केली आहे. अश्विनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड बघता त्याने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. अश्विनने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत त्याने निवृत्ती जाहीर केली आहे.
Indian cricketer Ravichandran Ashwin announces retirement from International Cricket.
(Pic: BCCI) pic.twitter.com/iHTXInz9Ja
— ANI (@ANI) December 18, 2024
अश्विनचा कसोटी विक्रम
अश्विनने 2011 पासून भारतासाठी 106 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने एकट्याने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. त्याने कसोटी सामन्यात 537 विकेट घेतल्या आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर 37 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. कसोटी सामन्यात अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. अश्विनच्या नावावर कसोटीत 3503 शतके आहेत. त्याने 6 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत.
ODI-T20 मध्येही सुपरहिट
एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर अश्विनने 116 सामन्यात 707 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याच्या नावावर 156 विकेट्स आहेत. अश्विनला भारताकडून 65 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. या कालावधीत त्याने 72 विकेट घेतल्या आहेत. 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघात अश्विनचाही समावेश होता.