Download App

Neeraj Chopra : नीरज चोप्राची वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक

Neeraj Chopra : भारतीय अॅथलीट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. बुडापेस्ट, स्वीडन येथे होत असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार आहे.

नीरजचा थ्रो एक अन् माईलस्टोन अनेक
– पहिल्या भालाफेकीतच 88.77 मीटर अंतर पार
– पहिल्या प्रयत्नातच फायलनसाठी पात्र
– ग्रुप A मध्ये पहिल्या स्थानावर आला
– फायनलसाठी पात्र होणारा पहिला भालाफेकपटू ठरला
– पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील पात्र झाला

नीरजने यंदाच्या सीझनमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यापूर्वी 88.67 मीटर ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तो आता पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक पुढील वर्षी 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

शिर्डी लोकसभेच्या तिकीटावरून विखेंचे थेट दिल्लीकडे बोट, आठवलेंचे काय होणार?

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये नीरजसह भारताचा डीपी मनू देखील भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात 78.1 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 81.31 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली.

National Film Awards 2023 : राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये पुष्पाच्या संगीतकारांचा अनोखा सन्मान!

वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 च्या पुरुष भालाफेक स्पर्धेत नीरजने अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने दुसरे स्थान पटकावले. त्याने 82.39 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. भारताचा डीपी मनू तिसऱ्या क्रमांकावर राहिला. डेव्हिड वेगनर चौथ्या स्थानावर राहिला. त्याने 81.25 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला.

Tags

follow us