ODI World Cup 2027 चा फॉरमॅट बदलला, ICC ची मोठी घोषणा; जाणून घ्या नवीन ‘सुपर सिरीज’ फॉरमॅट्स

ODI World Cup 2027 : आयसीसी 2027 क्रिकेट विश्वचषक  विश्वचषकाकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. दक्षिण आफ्रिका, नामिबिया

ODI World Cup 2027

ODI World Cup 2027

ODI World Cup 2027 : आयसीसी 2027 क्रिकेट विश्वचषक  विश्वचषकाकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे देशात होणाऱ्या या विश्वचषकासाठी आयसीसीकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आयासीसीने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत आता 12 ऐवजी 14 संघ सहभाग घेणार आहे आणि ही स्पर्धा तीन टप्प्यांत खेळवली जाणार आहे.

2027 चा विश्वचषक तीन टप्प्यांत खेळवला जाणार

एडिनबर्ग येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विश्वचषकाच्या स्वरूपातील बदलांबाबत आयसीसीने (ICC) माहिती दिली आहे. आयसीसीने 2027 चा विश्वचषक (ODI World Cup 2027) आणि टी20 विश्वचषकसाठी (T20 World Cup 2028) निर्णय घेण्यात आले आहे. 2027 चा विश्वचषक तीन टप्प्यांत खेळवला जाईल. पहिल्या टप्प्यात, 11 व्या, 12 व्या आणि 13 व्या क्रमांकाचे संघ एकमेकांविरुद्ध मालिका खेळतील त्यापैकी अव्वल क्रमांकाचा संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरेल.

दुसऱ्या टप्प्यात 12 संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या ग्रुपमधून अव्वल तीन संघ ‘सुपर 7’ टप्प्यासाठी किंवा तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. तिसऱ्या टप्प्यात सात संघ ‘राउंड-रॉबिन’ पद्धतीने खेळतील आणि त्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

2027 चा विश्वचषक कधी आणि कुठे ?

दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे 2027 च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत. ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. विश्वचषकासाठी अशा प्रकारचे स्वरूप आणण्याची आयसीसीची ही पहिलीच वेळ आहे.

EPFO ​​चा मोठा बदल! आता 5 लाख रुपयांपर्यंतचे PF दावे त्वरित होणार मंजूर ; जाणून घ्या नियम-

टी20 विश्वचषकातही बदल

2028 च्या टी20 विश्वचषकाचे सह-यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भूषवणार आहेत. आयसीसीने या आगामी विश्वचषकासाठी 20 संघांचे स्वरूप कायम ठेवले आहे. 2026 मध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘सुपर-8’ फॉरमॅटची जागा ‘सुपर-10’ फॉरमॅट घेईल. याचा अर्थ असा की दुसऱ्या फेरीत 10 संघ स्पर्धा करतील.

Exit mobile version