Download App

Oldest Test Cricketer Death : क्रिकेटविश्वात शोककळा, सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटूचे निधन

  • Written By: Last Updated:

Oldest Test Cricketer Death : माजी कसोटी क्रिकेटपटू रॉन ड्रेपर (Ron Draper) यांचे वयाच्या 98 व्या वर्षी (Oldest Test Cricketer Death) निधन झाले आहे. रॉन ड्रेपर जगातील सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू होते. 25 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचे निधन झाले. 1950 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेकडून दोन कसोटी सामने खेळलेले रॉन ड्रेपर सलामीवीर फलंदाज आणि यष्टीरक्षक होते. आता नील हार्वे 96 वर्षांचे सर्वात वयस्कर कसोटी खेळाडू आहे.

ड्रेपर यांचा जन्म 24 डिसेंबर 1926 रोजी झाला त्यांनी 19 व्या वर्षात ऑरेंज फ्री स्टेटविरुद्ध ईस्टर्न प्रांताकडून प्रथम श्रेणी पदार्पणात शतक झळकावले. 1949/50 मध्ये दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध प्रांताकडून 86 धावा काढल्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात निवडण्यात आले, परंतु तीन डावांमध्ये त्यांना फक्त 25 धावा करत्या आल्या. ड्रेपर 1959/60 पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होते आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीचा शेवट 41.64 च्या सरासरीने केला.

1952/53 च्या हंगामातील त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांच्या पहिल्या दिवशी त्यांनी लंचपूर्वी शतक झळकावले. दुसऱ्या सामन्यात, बॉर्डर विरुद्ध, त्यांनी दुसऱ्या डावात आणखी एक शतक झळकावले आणि दक्षिण आफ्रिकेच्या दीर्घकाळ चालणाऱ्या करी कप स्पर्धेत एकाच सामन्यात दोन शतके झळकावणारे पहिले खेळाडू ठरेल होते.

झेलेन्स्कीचा कॅमेऱ्यासमोर ट्रम्पशी वाद, अमेरिकेचा मोठा निर्णय, युक्रेनची आर्थिक मदत थांबणार?

मंगळवारी (25फेब्रुवारी 2025) ड्रेपरचे गकबेरा येथील घरी निधन झाले. शुक्रवारी (28 फेब्रुवारी 2025) त्यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांचे जावई नील थॉमसन यांनी केली. शेवटचे दोन सर्वात जुने कसोटी क्रिकेटपटू दोघेही दक्षिण आफ्रिकेचे होते. यामध्ये नॉर्मन गॉर्डन यांचा समावेश आहे, ज्यांचे 2016 मध्ये वयाच्या 103 व्या वर्षी निधन झाले आणि जॉन वॅटकिन्स 98 वर्षे जगले. 2021 मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

follow us

संबंधित बातम्या