Download App

पाकिस्तान संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाला 2023 च्या पहिल्याच दिवशी मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची माहिती आयसीसीने ट्विटरवरुन दिली आहे.

दरम्यान, पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता, तर नुकताच न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामनाही अनिर्णित राहिला होता. यानंतर पाकिस्तान संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.

पाकिस्तान संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीतून बाहेर पडला आहे, अशी माहिती आयसीसीने दिली आहे. आयसीसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये पाकिस्तान संघ WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर असल्याचे लिहिले आहे.

सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कराचीत खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला.

पाकिस्तान संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. पाक संघाने 2021-23 मध्ये आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तान संघाने 4 सामने जिंकले आहेत.

तर 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान संघाने 3 सामने अनिर्णित ठेवले आहेत. सध्या पाकिस्तान संघाला पॉइंट टेबलवर ३८.४६ टक्के गुण आहेत.

Tags

follow us